डांभुर्णीत १६ वर्षीय मुलाचा डोळे फोडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 20:39 IST2020-04-03T20:39:10+5:302020-04-03T20:39:16+5:30

गुरुवारी झाला होता बेपत्ता

4-year-old boy killed in stabbing | डांभुर्णीत १६ वर्षीय मुलाचा डोळे फोडून खून

डांभुर्णीत १६ वर्षीय मुलाचा डोळे फोडून खून


यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील १६ वर्षीय मुलाचे डोळे फोडून त्याच्या डोक्यावर विट मारून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आलीे. गुरूवारी सांयकाळपासून हा मुलगा बेपता होता. शुक्रवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने डांभुर्णीत तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे.
कैलास उर्फ बंटी चंद्रकांत कोळी असे या इयत्ता १० वी तील मुलाचे नाव असून तो गुरुवारी बेपता झाल्यावर रात्री व शुक्रवारी दिवसभर नातेवाईक व ग्रामस्थाच्या वतीने त्याचा शोध घेतला असता शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दत्तात्रय माणिक पाटील यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. कैलास हा एकुलता असून त्याने नुकतीच १० ची परीक्षा दिली असून त्याचा एका विषाचा पेपर बाकी आहे. त्याच्या पश्चात चार बहिणी, आई-वडील असा परीवार असून वडील मजुरी करतात.
गुरूवारी सायंकाळी कैलास कोणासोबत गेला होता याची चर्चाही गावात उघड सुरू आहे. गेल्या वर्षी डांभुर्णीत अशाचप्रकारे एका बालकाच्या डोळयात काडया घालून त्याचे डोळे फोडण्यात आले होते. मात्र तो मुलगा दिर्घ उपचारांनतर बरा झाला होता.
पो. नि. अरूण धनवडे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.

Web Title: 4-year-old boy killed in stabbing