निरीक्षणगृहात ४ फूट उंच संरक्षण जाळी
By Admin | Updated: March 2, 2017 00:57 IST2017-03-02T00:57:46+5:302017-03-02T00:57:46+5:30
खबरदारी : मुले पळाल्याबाबतचा अहवाल सादर

निरीक्षणगृहात ४ फूट उंच संरक्षण जाळी
जळगाव : बालनिरीक्षण गृहातून तीन मुलांनी पलायन केल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून निरीक्षण गृहाच्या भिंतीवर ४ फुट उंच जाळी बसविण्यात येणार असून ही जाळी तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, मुले पळून गेल्याबाबतचा अहवाल समितीने जिल्हा महिला व बालविकास अधिकाºयांकडे पाठविल्याची माहिती अधीक्षक सारिका मेतकर यांनी दिली.
गेल्या महिन्यात भुसावळ येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील तीन संशयित मुलांनी निरीक्षणगृहातून पळ काढला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी २० फेब्रुवारी रोजी निरीक्षणगृहाला भेट दिली होती. गुन्हेगारी पध्दतीने वागणाºया मुलांना न्यायालयाच्या परवानगीने अन्य जिल्ह्यात हलविण्यासह भविष्यात मुले पळून जावू नये यासाठी संरक्षण जाळी बसविण्याच्या सूचना सुपेकर यांनी निरीक्षण गृहाच्या समितीला केल्या होत्या. ज्या छतावरुन उडी मारुन पसार मुले झाले, त्या छताची पत्रे काढून घेतली. जिन्याजवळ असलेले ग्रील वाढविण्यात येणार आहे. खबरदारीसाठी काही उपाय सूचविले होते. वारंवार गुन्हे करणाºया मुलांना नाशिक येथे हलविण्याबाबतचा निर्णय बाल न्याय मंडळच घेऊ शकते, त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येत नसल्याचे मेतकर यांनी सांगितले.