शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीला संपाची ‘साडेसाती’! अखर्चिक रकमेसाठी हातात आठ दिवस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2023 19:15 IST

जळगाव जिल्ह्यातील आमदारांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला प्रत्येकी ४ कोटींची निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे. 

 कुंदन पाटील

जळगाव : जिल्ह्यातील आमदारांसाठी शासनाकडून प्राप्त झालेला प्रत्येकी ४ कोटींची निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागणार आहे. सार्वजनिक सुट्या गृहित धरल्यानंतर हा निधी खर्च करण्यासाठी आमदारांच्या हातात फक्त ८ दिवस शिल्लक आहेत. मात्र संपामुळे विकास कामांच्या प्रस्तावांचे सादरीकरण लांबल्याने ७ कोटी ६८ लाखांचा निधी वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील व मंगेश चव्हाण यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील दोन विधान परिषद सदस्यांसह १३ आमदारांना ४९ कोटी ६६ लाखांचा निधी राज्य शासनाने दिला होता. त्यातील ४१ कोटी ९८ लाखांचा निधी आमदारांनी खर्च केला आहे. उर्वरित ७ कोटी ६८ लाखांचा निधी ३१ मार्चपूर्वी खर्च करावयाचा आहे. लता सोनवणे, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, सुरेश भोळे यांनी खर्च करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र पालकमंत्र्यांसह मंत्री महाजन यांचा अनुक्रमे ६० लाख व १ कोटी ४४ लाखांचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे त्यांना ३१ मार्चपूर्वी विकास कामांसाठी निधी मंजूर करुन घ्यावा लागणार आहे.

आठच दिवस हातातदि.१७ मार्च ते ३१ मार्चदरम्यान गुढी पाडवा आणि श्रीराम नवमीची प्रत्येकी दिवस सुटी आहे. तसेच प्रत्येकी दोन शनिवार आणि रविवार येत असल्याने चार दिवस हातून जाणार आहेत. त्यामुळे आमदारांच्या हातात फक्त आठ दिवसांचा कालावधी उरला आहे.तशातच संप सुरु असल्याने विकास कामांच्या प्रस्तावासह मंजुरीसाठी कर्मचारी सेवेत नाहीत. त्यामुळे या आमदारांची चांगलीच कोंडी होऊन बसली आहे.

असा आहे अखर्चित निधीदि.१६ मार्चपर्यंत आमदारांनी खर्च केलेल्या ४ कोटींच्या निधीपैकी अखर्चित निधी असा : लता सोनवणे (९ लाख), गिरीश महाजन (१ कोटी ४४ लाख), सुरेश भोळे (१७ लाख), गुलाबराव पाटील (६० लाख), चिमणराव पाटील (८४ लाख), अनील पाटील (१२ लाख), किशोर पाटील (३ लाख), मंगेश चव्हाण (८३ लाख), संजय सावकारे (१ लाख), चंद्रकांत पाटील (२ लाख) व शिरीष चौधरी (९६ लाख).

पटेल यांचा सर्वाधिक निधी वायाविधानपरिषदेचे तत्कालीन सदस्य चंदूलाल पटेल यांना ३ कोटींचा निधी दिला होता. त्यापैकी २ कोटी ६६  लाखांचा निधी त्यांनी खर्च करण्याआधीच त्यांची आमदारकीचा कालावधी संपुष्टात आला. तर एकनाथ खडसे यांचा ३ कोटींपैकी ३७ लाखांचा निधी अखर्चित आहे.

  

टॅग्स :Jalgaonजळगावeknath khadseएकनाथ खडसेGulabrao Patilगुलाबराव पाटीलGirish Mahajanगिरीश महाजन