शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

१२१ इलेक्ट्रिक बसेससाठी ४ चार्जिंग सेंटर! ऑगस्टमध्ये येणार सेवेत; १० साध्या गाड्याही होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:39 IST

नव्याने बांधण्यात आलेल्या १० साध्या बसेस या आठवड्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत प्रवाशांची सोय होणार आहे.

कुंदन पाटील -जळगाव : जिल्ह्यातील बस आगारांसाठी १२१ इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टमध्ये दाखल होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात चारठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, नव्याने बांधण्यात आलेल्या १० साध्या बसेस या आठवड्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन सुटीच्या कालावधीत प्रवाशांची सोय होणार आहे.

या आर्थिक वर्षात १५० इलेक्ट्रिक बसेसचे कंत्राट उलेक्ट्रो आणि विनसेल या कंपन्यांना दिले आहे. तर ५१५० इलेक्ट्रिक बसेससाठी एसटीने निविदा काढली होती.त्यानुसार १२ एप्रिलपर्यंत निविदेची प्रक्रिया निकाली निघाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार जळगावच्या वाट्याला १२१ बसेस येणार आहेत.चारठिकाणी चार्जिंग सेंटरजिल्ह्यात चारठिकाणी चार्जिंग सेंटर उभारण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. जळगाव, चोपडा, पाचोरा व भुसावळ याठिकाणी बसेससाठी चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.१० साध्या बसेस येणारदरम्यान, डिझेलवर चालणाऱ्या आणि नव्याने बांधण्यात आलेल्या १० बसेस जळगाव विभागाला मिळणार आहेत.  सुट्या, सणावळी आणि लग्नसराईच्या काळात या बसेस येणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.ञकिती किलोमीटर धावते?इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यानंतर इंधनावरील खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. ३०० केडब्ल्यूएच बॅटरी क्षमतेची १२-मीटर बस चांगल्या हवामानाच्या दिवसांमध्ये तब्बल 375 किमी कव्हर करू शकते. परंतु हिवाळ्याच्या दिवशी, मायलेज १२० ते १३० किमीदरम्यान कमी देते. डिझेल हीटिंग २०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी पूरक ठरते. ञइलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्यंटर उभारणीचे काम सुरु झाले आहे. या सेंटरवरची सेवा कार्यान्वीत होताच इलेक्ट्रिक बसेस येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.-भगवान जगनोर, विभाग नियंत्रक 

टॅग्स :Jalgaonजळगाव