३९ लेटलतिफांचे एक दिवसाचे वेतन कपात

By Admin | Updated: May 18, 2014 01:19 IST2014-05-18T01:19:05+5:302014-05-18T01:19:05+5:30

बांधकाम विभागातील ३९ कर्मचारी उशिरा आल्याचे दिसून आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्त दौलतखा पठाण यांनी दिले आहेत

39 One day salary deduction for LTL | ३९ लेटलतिफांचे एक दिवसाचे वेतन कपात

३९ लेटलतिफांचे एक दिवसाचे वेतन कपात

 धुळे : महापालिकेतील लेटलतीफ कर्मचार्‍यांना शिस्त लावण्यासाठी आयुक्तांनी रोजची हजेरी घेणे सुरू केले आहे. दोन दिवसात बांधकाम विभागातील ३९ कर्मचारी उशिरा आल्याचे दिसून आल्याने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश आयुक्त दौलतखा पठाण यांनी दिले आहेत. महापालिका ही शहराचा विकास करणारी महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यामुळे रोज शहरातील नागरिकांचा संबंध महापालिकेशी येतो. अनेक नागरिक आपल्या तक्रारी व गाºहाणे घेऊन महापालिकेत येतात. परंतु अनेक संबंधित कर्मचारी व अधिकारी हे कार्यालयात वेळेवर येत नसल्याने नागरिकांची तसेच कार्यालयीन कामे नेहमी खोळंबतात. उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांना अनेका तोंडी सूचना देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारण न झाल्याने आयुक्तांनी रोज दहा वाजेला उपस्थित कर्मचार्‍यांच्या हजेरीचा अहवाल संबंधित विभाग प्रमुखांकडून मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यात बांधकाम विभागातच १६ रोजी २३ व १७ रोजी १६ कर्मचारी उशिरा आल्याचा अहवाल अभियंता कैलास शिंदे यांनी आयुक्तांकडे सादर केला. त्यावर आयुक्तांनी या कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कपातीचे आदेश दिले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: 39 One day salary deduction for LTL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.