बॅग लांबविणारी आंध्र प्रदेशातील 35 जणांची
By Admin | Updated: September 21, 2015 00:54 IST2015-09-21T00:54:19+5:302015-09-21T00:54:19+5:30
जिल्ह्याभरात सक्री टोळी य असल्याचे उघड :

बॅग लांबविणारी आंध्र प्रदेशातील 35 जणांची
चौकडीकडून दोन तोळे सोने व 28 हजाराची रोकड जप्त; आरोपींचा शोध सुरु जळगाव : जमिनीवर तुमचे पैसे पडले आहेत, असे सांगून शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भर बाजारातून कारमधील महिलेचे रोख रकमेसह तीन लाखाचे दागिने लांबविणा:या चौकडीकडून दोन तोळे सोने व 28 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, या टोळीतील अन्य साथीदार फरार झाले आहेत. 30 ते 35 जणांची ही आंध्र प्रदेशातील ही टोळी जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती समोर आली आहे. चोपडा येथील अनिता अनिल जैन (50) या दागिन्यांची दुरुस्ती व खरेदीसाठी कारने (क्र.एम.एच.19 बी.जे.0707) जळगावात आल्या होत्या. काम आटोपून सुभाष चौकात आईस्क्रीमच्या दुकानाजवळ त्या कारमध्ये बसल्या असताना चौघांपैकी दोघांनी कारच्या बाजूूला दहाच्या काही नोटा जमिनीवर टाकून त्यांनी मॅडम तुमचे पैसे खाली पडले असे सांगितले. मागे वळून पाहिले असता ते पैसे आपले नसल्याने चालक हिंमत पुंडलिक पाटील रा.भोई वाडा यांना तुमचे पैसे आहेत का? असे विचारले असता तितक्यात अन्य दोघांनी मागील सीटवरील हँड बॅग लांबविली. बॅग लांबविल्याचे समजताच अनिता जैन यांनी मुलाला बॅगेबाबत विचारणा केली. नकार दिल्याने त्याला तेथील पोलीस चौकीत नेण्यात आले. दरम्यान, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पौजदार बडगुजर, सिध्दार्थ बैसाणे, नरेंद्र ठाकरे, शेखर पाटील, गजानन बडगुजर, अनिल धांडे, मिलिंद बळवंतकंक, योगेश वाघ, जितेंद्र सोनवणे, सपकाळे व होमगार्ड विलास देसले यांना पाठलाग करायला सांगितले. अजिंठा चौकात एक जण पानटपरीवर तर दुसरा प्रवाशी वाहतूक करणा:या गाडीजवळ उभा असताना झडप घालून त्यांना पकडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरार आरोपींना शोधण्यासाठी मोबाईल लोकेशननुसार एलसीबीचे दिनेशसिंग पाटील,विजय पाटील, दिनेश बडगुजर, गोपाळ चौधरी व नरेंद्र वारुळे यांनी त्यांचा शिवाजी नगरात शोध घेतला,मात्रते सापडले नाहीत. लॅपटॉप चोरीच्या घटनांमध्ये संशय शहरात कारमधून लॅपटॉप व बॅगा लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात याच टोळीतील सदस्यांचा सहभाग असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. या टोळीत महिलाही समावेश आहे.