क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवत ३४ हजारांचा गंडा
By विलास.बारी | Updated: June 11, 2023 17:09 IST2023-06-11T17:09:32+5:302023-06-11T17:09:41+5:30
एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रेडिट कार्ड लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवत ३४ हजारांचा गंडा
जळगाव : क्रेडिट कार्डची लिमिट वाढविण्याचे आमिष दाखवत शिरसोली येथील भगवान सुपडू साेनार या तरुणाची ३४ हजार ६८० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसोली येथील भगवान सुपडू साेनार दि.१० रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांना एका अनोळखी इसमाने फोन करून आरबीएल क्रेडिट कार्डचे लिमिट वाढविण्याचे आमिष दाखविले. यादरम्यान मोबाइलवर ओटीपी पाठवून सोनार यांच्या खात्यातील ३४ हजार ६८० रुपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली.
याप्रकरणी सोनार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत.