शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

जळगावात ३३ दिवसात तब्बल २८ ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:15 IST

पोलिसांना आव्हान : एकही गुन्हा उघड नाही

सुनील पाटील

जळगाव : शहरात गेल्या काही दिवसापासून मालमत्ता व शरीराविरुध्दच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. ३ जून ते ६ जुलै या ३३ दिवसात शहरात चोरी व घरफोडीच्या तब्बल २८ घटना घडल्या आहेत. या घटनांची पोलिसात नोंद आहे, प्रत्यक्षात नोंद नसलेल्या घटना आणखी वेगळ्या आहेत. दिवसागणिक गुन्हे घडत आहेत. पोलिसांची रात्र व दिवसाची गस्त कागदोपत्रीच असल्याचे दिसून येत आहे.जून महिन्यातच सर्वाधिक चोरी व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्याशिवाय खून, दरोडा व प्राणघातक हल्ला यासारख्या घटनांनीही जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केला. निंबोल, ता.रावेर येथील विजया बॅँकेवरील दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न आणि सहाय्यक व्यवस्थापकाची गोळी झाडून झालेली हत्या असो कि मू.जे.महाविद्यालयात विद्यार्थ्याचा भरदिवसा झालेला खून या दोन्ही घटनांनी तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या दोन्ही घटना पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतल्या, त्यात मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या खूनाची घटना उघडकीस आणण्यात त्यांना यश आले. निंबोलच्या घटनेच्या तपासासाठी अजूनही दीडशेच्यावर अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. त्यात रविवारी बोदवडच्या जंगलात तृतियपंथीचा ख्ून झाला. पोलीस यंंत्रणा अन्य तपासात गुंतल्याची संधी म्हणा किंवा ढेपाळलेली गस्त यामुळेच चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.बसस्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेनवीन बसस्थानकात चोºया व पाकीटमारीच्या घटना वाढल्या आहेत. जून महिन्यात दोन महिलांचे दागिने लांबविण्यात आल्यानंतर एक शेतकºयाचे ५० हजार तर दुसºया शेतकºयाचे दहा हजार रुपये लांबविण्यात आले. एकेका दिवशी दोन व तीन घटना घडल्या आहेत. शनिवारीदेखील एकाचा मोबाईल तर दुसºयाचे पाकीट लांबविण्यात आले. घरफोड्यांचेही तसेच आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी पाच घरफोड्या झाल्या होत्या.अधिकाऱ्यांचे नियंत्रणच नाहीप्रभारी अधिकाºयांचे आपल्या कर्मचाºयांवर नियंत्रणच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काम करणारे कर्मचारी कामच करीत असतात तर अधिकाºयाच्या मागेपुढे फिरणारे त्यांची खासगी व घरगुती कामे करीत असतात, त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण इतर कर्मचाºयांवर पडत आहे. सहायक पोलीस अधीक्षकांनी अनेक प्रभारी अधिकाºयांना अवैध धंद्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत, मात्र तरी देखील त्यात सुधारणा झालेली नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव