पाच वर्षात 31 शेतक:यांनाच लाभ

By Admin | Updated: December 1, 2015 00:39 IST2015-12-01T00:39:01+5:302015-12-01T00:39:01+5:30

नंदुरबार : शेतक:यांसाठी असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे नाव बदलून आता स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नामकरण

31 years have benefited 31 farmers only | पाच वर्षात 31 शेतक:यांनाच लाभ

पाच वर्षात 31 शेतक:यांनाच लाभ

नंदुरबार : शेतक:यांसाठी असलेल्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे नाव बदलून आता स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे नामकरण करून एक लाखावरून दोन लाख रुपये विमा भरपाईची रक्कम करण्यात आली आहे. परंतु अनेक शेतक:यांना गेल्या अनेक वर्षापासून या योजनेची माहितीच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात 64 शेतक:यांनीच दावे दाखल केले. त्यापैकी केवळ 31 जणांनाच विम्याची रक्कम मिळाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे योजनेचे नाव बदलून आणि विम्याची रक्कम वाढवून उपयोग नाही, तर शेतक:यांमध्ये या योजनेची जागृती करणेही तेवढेच गरजेचे आहे.

शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा इतर कारणांनी होणा:या अपघातांमुळे शेतक:यांचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे कुटुंब उघडय़ावर येते; ही बाब लक्षात घेता शेतक:यांसाठी अर्थात ज्याच्या नावावर सातबारा उतारा आहे, अशा शेतक:यांसाठी शासनाने 2005 पासून शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यान्वित केली होती. या योजनेत पाच वर्षात बरेच बदल झाले. शिवाय शेतक:यांर्पयत या योजनेचे फायदे आणि मिळणारे लाभ याची माहिती पोहचविली गेली नाही. परिणामी शेतक:यांना या योजनेचा काहीएक उपयोग झाला नाही. पाच वर्षात जे दावे दाखल झाले ते अगदीच नगण्य असे होते. त्यातील निम्मे तर मंजूरच झाले नाहीत.

कशी आहे योजना..

शेतकरी अपघात विमा योजनेचे नाव बदलून आता स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा असे नामकरण करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतक:याच्या नावाचा सातबारा आहे, अशा 10 ते 75 वयोगटातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतील. शेतक:यांच्या अपघात विम्याची रक्कम शासन परस्पर भरेल. शेतक:यांनी यापूर्वी इतर कुठलेही विमे काढले असतील तरी त्याचा याला काही अडसर राहणार नाही.

केव्हा मिळेल फायदा

शेतक:याचा अपघातात मृत्यू झाल्यावर अर्थात रस्ता अपघात, वीज पडून, विजेचा शॉक, पूर, सर्पदंश यासह इतर अपघातांचा त्यात समावेश असेल. अपघाती मृत्यूला दोन लाख, अपघातात दोन डोळे निकामी झाल्यास दोन लाख, दोन अवयव, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख, तर एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यासाठी घटना घडल्यानंतर ठरावीक मुदतीत जवळच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

यापूर्वी ही योजना 2005 पासून कार्यान्वित करण्यात आली होती. त्या वेळी योजनेचे नाव शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना असे होते. 2009-10 मध्ये योजनेचे पुन्हा नाव बदलण्यात येऊन शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले आहे. 2007-08 र्पयत या योजनेची अंमलबजावणी महसूल विभागामार्फत करण्यात आली. त्यानंतर 2008-09 पासून ही योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे. आताही कृषी विभागच ही योजना राबविणार आहे.

अवघे 64 दावे

गेल्या पाच वर्षात अर्थात 2010-11 पासून तर 2015 र्पयत केवळ 64 जणांनी विम्यासाठी दावा दाखल केला होता. त्यापैकी केवळ 31 दावे मंजूर करण्यात आले. सर्वाधिक प्रकरणे 2010-11 व 2011-12 मध्ये होते. त्यानंतर प्रकरणांची संख्या कमी झाली. गेल्या वर्षी तर केवळ चारच दावे दाखल झाले होते.

जनजागृतीचा अभाव

या योजनेविषयी कृषी विभागाकडून जनजागृती होत नसल्यामुळे ही स्थिती आहे. अनेक शेतक:यांना अशा प्रकारची योजना असते किंवा आहे हेच माहिती नाही. त्यामुळे मोठय़ा अडचणी निर्माण होत असतात. आता शासनाने योजनेचे नाव लोकनेत्यांच्या नावाने केले आहे.

शिवाय विम्याची रक्कमही वाढविली आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ मिळावा यासाठी कृषी विभागातर्फे जनजागृती होणे आवश्यक आहे. जेवढी जास्त जनजागृती होईल तेवढा फायदा सर्वसामान्य शेतक:यांना होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतक:यांर्पयत ही योजना पोहचली पाहिजे या दृष्टीने प्रय} व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: 31 years have benefited 31 farmers only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.