शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

चाळीसगावला सीएम चषक स्पर्धेत ३१ हजार खेळाडुंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 17:50 IST

सीएम चषक अंतर्गत पार पडलेल्या क्रीडा आणि कला स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी सायंकाळी शहिद हेमंत जोशी क्रीडांगणगावर पडला. स्पर्धेत तालुक्यातील ३१ हजार खेळाडू, स्पर्धक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देपारितोषिक वितरण७०० खेळाडू, स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवमहाराष्ट्राची लोकधारा कलाविष्कार कार्यक्रम ठरला आकर्षणअभिनेत्री रेशीम टिपणीस यांच्या नृत्याने उपस्थित भारावले

चाळीसगाव, जि.जळगाव : सीएम चषक अंतर्गत पार पडलेल्या क्रीडा आणि कला स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी सायंकाळी शहिद हेमंत जोशी क्रीडांगणगावर पडला. स्पर्धेत तालुक्यातील ३१ हजार खेळाडू, स्पर्धक सहभागी झाले होते. ७०० खेळाडू व स्पर्धकांना आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. राजेश सरकटे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा कलाविष्कारासह अभिनेत्री रेशीम टिपणीस यांच्या नृत्याने उपस्थित भारावले.प्रारंभी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार भाजपा तालुकाध्यक्ष के बी साळुंखे, शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, डीवायएसपी नजीर शेख, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, सभापती स्मितल बोरसे, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या संस्थापिका संपदा पाटील, उपसभापती संजय पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील, प्रीतमदास रावलानी, तुकाराम गवळी, श्रीनिवास खंडेलवाल, लालचंद बजाज धर्मराज वाघ, महिला आयोग सदस्या देवयानी ठाकरे, प्रा.ए ओ पाटील, पं.स. सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, वाहतूक शाखेचे निरीक्षक सुरेश शिरसाठ, नगरसेविका विजया भिकन पवार, विजया पवार, वैशाली राजपूत, संगीता गवळी, चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे, आनंद खरात, नितीन पाटील, चिराग शेख, मानसिंग राजपूत, भास्कर पाटील, दिनेश बोरसे, एकनाथ चौधरी, प्रभाकर चौधरी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे, अनिल नागरे, अ‍ॅड प्रशांत पालवे, अमोल नानकर, अविनाश ठाकरे, सोमसिंग राजपूत, क्रीडा आघाडीचे पंकज साळुंखे, अजय देशमुख आदी उपस्थित होते.क्रिकेट स्पर्धांमध्ये आझाद क्रिकेट क्लब, छत्रपती ११, नेताजी पालकर, सीएसएन टायगर, इंडियन फायटर्स, ग्रेस अकॅडमी, तर महिला गटात जिल्हा परिषद शाळा शिंदी, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज, नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालय या संघांनी विजेतेपद पटकाविले.व्हॉलिबॉल स्पर्धेत अंधशाळा ए टीम, अंधशाळा सी टीम तसेच पासिंग प्रकारात तरवाडे टायगर, राष्ट्रीय विद्यालय, चाळीसगाव यांनी विजय संपादन केला. धावण्याच्या स्पर्धेत सात हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. खोखो स्पर्धेत माध्यमिक आश्रमशाळा देवळी, राष्ट्रीय क्रीडा मंडळ चाळीसगाव, माध्यमिक आश्रमशाळा देवळी, जिल्हा परिषद शाळा, ओझर, य. ना. चव्हाण महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय वाघळी, यांनी विजय संपादन केला. हॅॅण्डबॉल स्पर्धेत टीम यंगस्टार, ओम साई, रूद्र वॉरियर्स, आनंदीबाई बंकट मुलींची शाळा टीम ए, आनंदीबाई बंकट मुलींची शाळा टीम बी, पूर्णपात्रे विद्यालय, चाळीसगाव यांनी बक्षिसे पटकाविली. कॅरम स्पर्धेत फिरोज शेख, रमजान शेख, चेतन बागड, मयुरी सोनवणे, ऋतुजा पाटील यांनी विजय संपादन केला. कबड्डी स्पर्धेत टिम वसंतराव नाईक चाळीसगाव, ओमसाई ओढरे, शिवधर्म टाकळी, आ. बं. हायस्कूल चाळीसगाव, माध्यमिक विद्यालय बहाळ, य. ना. चव्हाण महाविद्यालय चाळीसगाव यांनी बक्षिसांवर नाव कोरले. नृत्य स्पर्धेत ओजस्वी ग्रुप, शाडो ग्रुप, हॅपी बॉईज ग्रुप, राजवीर राजपूत, समृद्धी बच्छाव, निल पाटील, शुभम गजरे, लीना महाले, साक्षी गवळी, समीक्षा तायडे आदींना गौरविले गेले. गायन स्पर्धेत सिद्धेश खैरनार, सौरभ बागड, प्रकाश राठोड, रोशली गेडाम गोडघाटा, साक्षी वाघ, श्रावणी कोटस्थाने, कुशाग्र बडगुजर, हर्षवर्धन जोंधळे, प्रणव पवार, स्नेहल सापनर, गायत्री चौधरी, अमृता कसबे आदींचे सूर सर्वश्रेष्ठ ठरले. रांगोळी स्पर्धेत अनिता पिंगळे, राजश्री शेटे, नयना पाटील यांना पुरस्कार देण्यात आले.कुस्तीमध्ये स्पर्धा आणि १००, ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण रजत, कास्य पदक व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत चैतन्य सातपुते, तेजल नानकर, राजश्री देशमुख यांचा गौरव झाला. तालुक्यातील क्रीडा व कला क्षेत्रात कार्यरत गुरूजनांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन जितेंद्र वाघ यांनी केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChalisgaonचाळीसगाव