गुजरात हद्दीजवळ ३० लाखांची अवैध दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:23 IST2017-12-09T15:37:09+5:302017-12-09T16:23:24+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवापूर पोलिसांची कारवाई

30 lakh illegal liquor was caught near the border of Gujarat | गुजरात हद्दीजवळ ३० लाखांची अवैध दारू पकडली

गुजरात हद्दीजवळ ३० लाखांची अवैध दारू पकडली

ठळक मुद्देगुजरात हद्दीजवळ पकडला ३० लाखांचा मद्यसाठागुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठा जात असल्याची मिळाली नवापूर पोलिसांना माहिती.ट्रकसह संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नंदुरबार- महाराष्ट्र- गुजरात हद्दीवरील राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या दारूची वाहतूक करणारा एक ट्रक नवापूर पोलिसांनी शनिवारी दुपारी पकडला. त्यात ३० लाखांचा मद्यसाठा मिळून आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यासाठा रवाना केला जात असल्याची गुप्त माहिती नवापूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार साहाय्यक फौजदार पवार, पाटील व थोरात या कर्मचाºयांनी ट्रकवर पाळत ठेवली. गुजरात हद्दीजवळ संशयित ट्रक पकडण्यात आला. त्याची तपासणी केली असता मागच्या बाजूला खाद्य आणि त्याच्या खाली दारूचे खोके लपविण्यात आले होते. पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत त्यातील दारूचे खोके उतरविले. ३० लाख रुपये किंमतीचे ८० खोके या ट्रकमध्ये मिळून आले. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

हा मद्यसाठा कोठून आला होता, कुणाकडे जात होता तसेच स्थानिक व्यापाºयाशी याचा काही संबध आहे का? या अनुशंगाने नवापूर पोलीस चौकशी करीत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: 30 lakh illegal liquor was caught near the border of Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.