३0 कोटींचे दागिने बेहिशेबी !
By Admin | Updated: September 12, 2014 14:44 IST2014-09-12T14:44:09+5:302014-09-12T14:44:09+5:30
आर.सी. बाफना ज्वेलर्स यांच्याकडे घोषित मालमत्तेपेक्षा सुमारे ३0 कोटींच्या रकमेचे जादा सोने व चांदी आढळून आले आहे.

३0 कोटींचे दागिने बेहिशेबी !
जळगाव : आर.सी. बाफना ज्वेलर्स यांच्याकडे घोषित मालमत्तेपेक्षा सुमारे ३0 कोटींच्या रकमेचे जादा सोने व चांदी आढळून आल्याने आयकर विभागाने दुसर्यांदा या प्रतिष्ठानची तपासणी केल्याची माहिती आयकर विभागाच्या एका अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'लोकमत'ला दिली.
काही महिन्यांपूर्वी या फर्ममध्ये तपासणी झाली होती. त्या वेळी बाफना ज्वेलर्सतर्फे जादा आढळून आलेल्या रकमेवरील कराची रक्कम तत्काळ भरण्यात आली होती.
त्या वेळी मोठय़ा रकमेची मालमत्ता तपासणीत मिळून आल्याने आयकर विभागाने काही महिन्यातच दुसर्यांदा तपासणी सुरूकेल्याचे या अधिकार्याने सांगितले.
■ बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरूच होती. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून पुन्हा तपासणी सुरूकरण्यात आली.
■ तिन्ही शोरूमचे प्रवेशद्वार बंद असून तपासणीत तिसरा दिवसही जाणार आहे. त्यामुळे व्यवहार ठप्प आहेत.
■ आयकर अधिकार्यांनी आर.सी. बाफना ज्वेलर्सच्या संचालकांचे भ्रमणध्वनी तसेच संपर्काचे साधन आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
■ बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.