डांगरी विकास सोसायटीत ५४ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 10:11 PM2019-07-23T22:11:05+5:302019-07-23T22:11:13+5:30

अमळनेर : तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत तत्कालीन संचालकांसह इतरांनी ५४ लाख ६६ हजार ४६० ...

 3 lakhs kidnapping in Dangri Development Society | डांगरी विकास सोसायटीत ५४ लाखांचा अपहार

डांगरी विकास सोसायटीत ५४ लाखांचा अपहार

Next


अमळनेर : तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत तत्कालीन संचालकांसह इतरांनी ५४ लाख ६६ हजार ४६० रुपयांचा संगनमताने अपहार केला. या प्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
२३ जुलै रोजी जळगाव येथील सहकारी संस्थेचे (पणन) वर्ग एकचे विशेष लेखा परीक्षक अनिल गंगाराम पाटील, रा.जळगाव यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. सन २०१३ ते २०१८ दरम्यान संचालकासह सचिव, चेअरमन, कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक व क्षेत्रीय अधिकारी यांनी संगनमताने मिळून पदाचा दुरुपयोग केला.
यावरून संस्थेचे तत्कालीन सचिव मोहनकुमार गंगाधर पवार, चेअरमन अनिल शिसोद, रामकृष्ण पाटील, संगीताबाई शिसोदे, अंतरावर शिसोदे, गुलाबराव शिसोदे, उदय शिसोदे, बाळासाहेब शिसोदे, वसंतराव व्ही. पाटील, शालीक पाटील, नामदेव वानखेडे, रमेश बोरसे, संतोष भोई (मयत), अशोक पाटील, देवका भोई, उदय पाटील, श्रावण भोई, छगन पाटील, अरुण शिसोदे, भाईदास पाटील, प्रशांत कुमावत, मीना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, निर्मला चौतमन, कमलाकर शिसोदे, दिनकर देसल, गुलाबराव पाटील, जयराम पाटील, किशोर पवार या सर्व ३० आरोपींविरोधात संगनमताने गैरव्यवहार करून अपहार केल्याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला करीत या प्रकाराने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

विकास सोसायटीत अपहार प्रकरणी तत्कालीन सचिवाने केलेला गैरव्यवहार माझ्या लक्षात आला. याबाबत मी तक्रार तसेच चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सहायक निबंधक यांच्याकडे केली होती. या गैरव्यवहारास सचिव व जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक, क्षेत्रीय अधिकारी जबाबदार आहेत. मात्र आमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता चौकशीअंती सत्य समोर येईलच.
-अनिल शिसोदे, तत्कालीन चेअरमन, विकास सोसायटी, प्रगणे डांगरी

Web Title:  3 lakhs kidnapping in Dangri Development Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.