२९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST2021-05-07T04:16:52+5:302021-05-07T04:16:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोळवलकर रक्तपेढी यांच्या वतीने ०३ मे रोजी रक्तदान ...

29 blood donors donated blood | २९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

२९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गोळवलकर रक्तपेढी यांच्या वतीने ०३ मे रोजी रक्तदान शिबिर सत्यवल्लभ हॉल येथे सकाळी ९ ते १ या वेळेत घेण्यात आले. शिबिरात तब्बल २९ दात्यांनी रक्तदान केले.

प्रमुख पाहुणे म्हणून नितीन पारगावकर, रा. स्व. संघाचे जळगाव शहर कार्यवाह राजेश ज्ञाने, दीपक अट्रावलकर, शहर व्यवसाय प्रमुख योगेश इंगळे, आमदार सुरेश भोळे, पिंटू काळे, आंबेडकर नगराचे कार्यवाह सागर उपाध्ये, सहकार्यवाह श्रीरंग जोशी, शहर सेवा सदस्य पीयूष श्रावगे, सचिन रत्नपारखी, हितेंद्र टेकावडे आदी उपस्थित होते. शिबिरात स्वयंसेवक आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. एकूण २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच अयोध्यानगर येथे ९ मे रोजी सकाळी १० ते १ च्या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती शिबिरात देण्यात आली. शिबिराचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी शिबिराच्या दिवशी येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 29 blood donors donated blood