शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

साडेचार हजार हेक्टरवर अडीच लाख मेट्रीक टन चाऱ्याचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 00:34 IST

पशुसंवर्धन विभागाच्या उपाययोजना : बारा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मदत

जळगाव- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गुरांची चाऱ्यासाठी वणवण होऊ नये म्हणून प्रशासनाकडून डिसेंबरच्या सुमारास शेतकऱ्यांना बियाणे वाटप करून ४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची लागवड करून यातून २ लाख ७४ हजार ४०९ मेट्रीक टन चारा उत्पादित केला आहे. जिल्हाभरातील १२ हजार ७३४ शेतकऱ्यांना याची मदत झाल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण गरज व उत्पादित चारा यातील तफावत बघता काही प्रमाणात चाऱ्याची चणचण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, जुलैपर्यंतचे नियोजन असले तरी पावसाने दांडी मारल्यास चारा छावण्याची गरज भासण्याची आवश्यकता विभागाने वर्तविली आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीत चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेले असल्याने त्यातच पाणीटंचाई यामुळे मिळेल त्या भावात गुरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपल्याचे चित्र शनिवारी जळगावात भरलेल्या पशुबाजारात निदर्शनास आले होत़ मात्र, चाऱ्यांची टंचाई उद्भवू नये म्हणून आपण याचे कधीपासूनच नियोजन केलेले असते़ त्यानुसार चाऱ्याची लागवडही करण्यात येते़ शेतकऱ्यांना तो चारा वाटपही करण्यात आला आहे़ डिसेंबर व काही बियाणे जानेवारीत दिल्यानंतर दोन ते तीन महिन्यात त्याचे उत्पादन निघते.

आकडे बोलतातजिल्ह्यात सध्या ११ लाख ८५ हजार ३८० पशुधन आहे़प्रतिदिन ४ हजार ७७८ मे़ टन चारा लागतो़ऑक्टोबर १८ ते जुलै २०१९ पर्यंत १४ लाख ३३ हजार ५११ मे़ टन चारा लागणार आहेएकूण उत्पादित होणारा चारा १३ लाख ७८ हजार ८८९ आहे.

काही प्रमाणात चाऱ्याची टंचाईची परिथिस्ती या आकडेवारीवरून दिसते मात्र, शेळ्या मेंढ्यांना आपण चारा देत नाही, तरीसुध्दा त्यांना यात गणले जाते, कधी गरज पडल्यास त्यांनाही पुरविला जातो़ त्याप्रमाणे कृषी विभागाने केलेल्या उपायोजना यात ग्राह्य धरलेल्या नाहीत़ त्यामुळे सध्या तरी चाराटंचाईचा विषय बिकट नसल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ए़ एम़ इंगळे यांनी दिली. चारा लागवडीसाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते़ शेतकऱ्यांना डिसेंबरला बियाणे वाटप करण्यात आले. याची लागवड होऊन एप्रिल महिन्यात अडिच लाखांच्यावर चाऱ्याचे उत्पादन आलेले आहे़ दरम्यान, यंदा गाळपेरा जमिनीत चारा लागवडीसाठी धरणक्षेत्रातील शेतकऱ्यांना २१ हजार ८५ किेलो चाºयाचे बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यातून २७ हजार ६१८ मे़ टन चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे.पाण्याची परिस्थिती बिकटजिल्हाभरात पाण्याचे स्त्रोत आटत आहे़ मोठ्या प्रमाणवर गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो़ अशा स्थितीत जिल्हाभरातील सर्व पशुधनाला २ कोटी ८६ लाख ११ हजार ५१० लिटर पाणी रोज लागते़ अशा स्थितीत गुरांचेही पाण्याअभावी हाल होत असतानाचे चित्र आहे. 

टॅग्स :cowगाय