चाळीसगावला 25 हजाराची दहीहंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 15:09 IST2017-08-12T15:08:45+5:302017-08-12T15:09:38+5:30

पप्पूदादा गुंजाळ मित्र मंडळाचे आयोजन

25 Hundred Dahi Handi Chalisgaon | चाळीसगावला 25 हजाराची दहीहंडी

चाळीसगावला 25 हजाराची दहीहंडी

ठळक मुद्देप्रत्येक सहभागी पथकाला बक्षीसऑर्केस्ट्राचेही आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव:  यंदा चाळीसगाव शहरात दहीहंडी (गोपाळकाला) उत्सव दणक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून  स्व. पप्पूदादा गुंजाळ मित्र मंडळातर्फे  पहिले बक्षिस म्हणून 25 हजार 555 रुपये देण्यात येणार आहे. सोमवारी साजरा होणा-या उत्सवासाठी गोविंदा पथकांचीही जोरात तयारी सुरु आहे.
दयानंद कॉर्नर येथे दहीहंडी बांधण्यात येईल. दहीहांडी फोडण्याचा प्रय} करणा:या प्रत्येक गोविंदा पथकाला रोख बक्षिसे व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. विजेत्या पथकाला 25 हजार 555 रुपयांचे बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. यावेळी देशभक्तिपर गीतांचा ऑर्केस्टा सादर केला जाणार आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उमेष गुंजाळ, जि.प.सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, पवन भिला सोनवणे यांच्यासह सचिन संतोष चौधरी, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, एरंडोलचे माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, जळकेकर महाराज आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली.

Web Title: 25 Hundred Dahi Handi Chalisgaon