महावितरणमध्ये 2300 पदे रिक्त
By Admin | Updated: February 22, 2017 00:45 IST2017-02-22T00:45:52+5:302017-02-22T00:45:52+5:30
सेवेसह वसुलीवर परिणाम : अधिकारी व कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण

महावितरणमध्ये 2300 पदे रिक्त
जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील जळगाव परिमंडळात अभियंते, तांत्रिक कामगारांसह विविध विभागातील एकूण 2 हजार 300 पदे रिक्त आहेत़ कार्यरत अभियंता, कर्मचा:यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याने ग्राहकांना सेवा देण्यासह थकबाकी वसुलीवर त्याचा विपरीत परिणाम होत आह़े
महावितरण कंपनीच्या सेवेचा गाडा हाकण्यामध्ये अभियंता, तांत्रिक कामगार यांच्यावर महत्वाची जबाबदारी असत़े तांत्रिक अडचणी सोडवून ग्राहकांना तत्परसेवा देणे तसेच वसुलीमध्ये अभियंता व तांत्रिक कामगाराचा महत्वाचा वाटा असतो़ नेमके जळगाव परिमंडळ कार्यालयात एकूण रिक्त पदांमध्ये अभियंता संवर्गाची 80 तर तांत्रिक कामगाराची सुमारे दोन हजार पदे रिक्त आह़े त्यामुळे वाढती थकबाकी वसुलीसह ग्राहकांना सेवा देताना महावितरण कंपनीतील वरिष्ठांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े
थकबाकी वसुलीसाठी वेळच नाही
जळगाव परिमंडळाचे 14 लाख ग्राहक आहेत़ मात्र एक लाख ग्राहकांमध्ये केवळ तीस कर्मचारी अशी कंपनीची परिस्थती आहेत़ वादळ वा:यामुळे तारा पडून, खांब वाकणे यामुळे विद्युत पुरवठा खंडीत होवून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत़े वीजचोरीमुळे रोहित्रावर अतिभार पडतो़ मार्च आर्थिक वर्ष असल्याने थकबाकी वसुलीसाठी केवळ तीन महिने मिळतात़ अपूर्ण मनुष्यबळात कोटय़वधींची वसुली पूर्ण करण्याचे आव्हान कंपनीसमोर आह़े