शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

भुसावळच्या २३ सायकलपटूंनी पूर्ण केले पाल सायकलिंग चॅलेंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 14:18 IST

भुसावळच्या २३ सायकलपटूंनी पाल सायकलिंग चॅलेंज बुधवारी पूर्ण केले.

ठळक मुद्देभुसावळ स्पोर्ट्स अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजन सर्व सायकलपटूंनी निर्धारित वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली

भुसावळ : स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे  ‘पाल अल्ट्रा हिल सायकलिंग चॅलेंज’  या १०० किलोमीटर व ५० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अवघड अशा या स्पर्धेत २३ सायकलपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. ५० किलोमीटरसाठी भुसावळ ते खिरोदा व पुन्हा परत भुसावळ असा मार्ग होता, तर १०० किलोमीटरसाठी भुसावळ खिरोदा पाल व त्याच मार्गे परत भुसावळ असा मार्ग होता. मार्गात ठिकठिकाणी सायकलपटूंचे उपस्थित ग्रामस्थ आस्थेने विचारपूस करीत होते व कौतुक करीत होते. सकाळी सहाला उपविभागीय पोलीस उपअधीक्षक  सोमनाथ वाकचौरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेस सुरुवात झाली. याप्रसंगी  वाकचौरे यांनी सायकलपटूंनीअवघड अशा मार्गावर सायकल चालवणे आव्हानात्मक असून त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबविल्याबद्दल भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनचे अभिनंदन केले. ५० किलोमीटरसाठी ३ तास ३० मिनिटे तर १०० किलोमीटरसाठी ८ तास ३० मिनिटांचा कमाल कालावधी ठरविण्यात आला होता. सर्व सायकलपटूंनी निर्धारित वेळेच्या आत स्पर्धा पूर्ण केली. सर्व यशस्वी सायकलपटूना प्रमाणपत्र व पदक प्रदान करण्यात येईल, अशी माहिती संयोजक प्रवीण पाटील व ब्रिजेश लाहोटी यांनी दिली.  या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पूनम कुलकर्णी या महिला सायकलपटूने १०० कि.मी.  गटात प्रतिनिधित्व करून ही स्पर्धा सहजपणे पूर्ण केली. त्यांच्याशिवाय सीमा पाटील व सोनाली पाटील यांनीदेखील ५० किलोमीटरमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. तसेच प्रशांत अत्रे यांनी १०० किलोमीटरचे अंतर सिंगल गिअरच्या सायकलने सहज  पूर्ण केले. पालचा सातपुडा डोंगर पार करणे आव्हानात्मक होते परंतु भुसावळ रनर्सच्या सदस्यांनी ठिकठिकाणी केलेली पाणी व फळांची व्यवस्था तसेच त्यांनी केलेल्या कौतुकामुळे आम्ही ही स्पर्धा सहजपणे पूर्ण करू शकलो, असे अँड.दिलीप जोनवाल व डॉ. तुषार पाटील यांनी सांगितले. भुसावळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रिया पाटील व हर्षल लोखंडे, खिरोदा येथे शेख रिजवान व श्रीकांत नगरनाईक तर पाल येथे अजय पाटील व राजेंद्र ठाकूर हे प्रत्येक स्पर्धकाच्या वेळेची नोंद घेत होते. ही संपूर्ण स्पर्धा भुसावळ तालुक्यातील प्रथम बीआरएम विलास पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्पर्धेआधी पूनम भंगाळे यांनी वॉर्मअप घेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.नीलिमा नेहेते होत्या.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, रणजित खरारे, स्वाती फालक,  चारुलता अजय पाटील, प्रमोद शुक्ला, सरोज शुक्ला यांनी सहकार्य केले.सहभागी स्पर्धक : अथर्व शितोळे, भाऊसाहेब पाटील, चंद्रशेखर सोनवणे, चेतनकुमार शाह, दत्तू सपकाळे, जयश्री पाटील, कैलास छाबरा, नितीन साळुंके,  नितीन रमानी, प्रकाश अटवाणी, सचिन मनवानी, सीमा पाटील, उमेश घुले, योगेश लुंकड, डॉ.महेश फिरके, डॉ.तुषार पाटील, प्रशांत अत्रे, पूनम कुलकर्णी, अँड.दिलीप जोनवाल. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ