शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षीय इंजीनिअर तरुण नोकरीसाठी पुण्यात आला अन् भीषण अपघातात जागीच मृत्यू; कुटुंबावर शोककळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:22 IST

शनिवारची सुटी असल्याने एका कामानिमित्त जात असताना सासवड येथे अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Pune Accident: पुणे येथे दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. या पैकी एक तरुण हा फैजपूर, ता. यावल येथील तर दुसरा तरुण हा खिर्डी ता. रावेर येथील रहिवासी होता.  

फैजपूर शहरातील पेहेड वाड्यातील रहिवासी भावेश सुरेंद्र चौधरी (२२) या तरुणाचे ८ रोजी शनिवारी पुणे (सासवड) येथे अपघाती निधन झाले. भावेश दुचाकीवरून जात असताना रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला धडक बसून भावेशचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई व दोन बहिणी असा परिवार आहे. हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण होऊन सहा महिन्यांपूर्वीच तो पुणे येथे नोकरीस लागला होता. शनिवारची सुटी असल्याने एका कामानिमित्त जात असताना सासवड येथे अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यावर फैजपूर येथे रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

खिर्डी येथील शुभमच्या दुचाकीस ट्रॅक्टरची धडक खिर्डी, ता. रावेर : पुणे येथे अभियंता असलेल्या शुभम वसंत पाटील या ३० वर्षीय युवकाचा पुणे येथील रावेत भागात ६ रोजी आपघाती मृत्यू झाला. रात्री ११ च्या सुमारास ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने शुभम गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, रावेत पोलिसात आरोपी ट्रॅक्टर चालक चंद्रशेखर ग्वानाप्पा मुदगल (वय २४, रा. मस्केवस्ती, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभमवर ७ रोजी खिर्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील तो एकुतलता मुलगा होता. पश्चात पत्नी, आई, वडील, असा परिवार आहे

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात