शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघासाठी २१ मतदान केंद्र, २६ जून रोजी होणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:14 IST

जळगाव शहरात तीन तर भुसावळ, अमळनेर, चाळीसगावमध्ये प्रत्येकी तीन केंद्र

कुंदन पाटीलजळगाव : नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी तालुकानिहाय २१ मतदान केंद्र जाहीर करण्यात आले आहेत. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली मतदारांच्या क्रमांकानिहाय ही मतदान केंद्र निश्चीत करण्यात आली आहेत.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दि.२४ रोजी निवडणुक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात १३ हजार ५६ मतदार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला आहे. त्यानुसार ही मतदान केंद्र जाहीर करण्यात आली आहेत. जळगाव शहरात तीन तर अमळनेर, चाळीसगाव आणि भुसावळमध्ये प्रत्येकी दोन मतदार केंद्र आहेत. अन्य तालुक्यात मात्र प्रत्येकी एक केंद्र आहेत. मतदान केंद्र निश्चितसाठी प्रशासनाने शहरातील मध्यवर्ती सभागृह, शाळांना प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे मतदारांना लांबचा प्रवास करावा लागणार नाही. राजकीय प्रतिनिधींची बैठक 

दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणुक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. या बैठकीत मतदारांची संख्या, मतदार याद्यांतील दुरुस्तीसह अन्य प्रशासकीय बाबींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला राजकीय प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सुनिल माळी, किरण राजपूत उपस्थित होते. 

तालुकानिहाय मतदान केंद्रचोपडा-तहसील कार्यालययावल-तहसील कार्यालयरावेर-तहसील कार्यालयमुक्ताईनगर-तहसील कार्यालयबोदवड सभागृह, तहसील कार्यालयभुसावळ-डी.एस.हायस्कुल जळगाव-आर.आर.विद्यालय, लाठी विद्यामंदिरधरणगाव-तहसील कार्यालयअमळनेर-राजसारथी सभागृह व तहसील कार्यालयपारोळा-तहसील कार्यालयएरंडोल-तहसील कार्यालयभडगाव-तहसील कार्यालयचाळीसगाव-चव्हाण महाविद्यालयपाचोरा-तहसील कार्यालयजामनेर-जि.प.शाळा हॉल.

टॅग्स :Jalgaonजळगाव