थांबलेल्या लक्झरी बसमधून २१ लाखांची चांदीची बिस्किटे चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:26+5:302021-06-18T04:13:26+5:30
गोपाराम देवासी (२४, रा. राजस्थान, ह.मु. हिंगोली) यांना तीस किलो चांदीची बिस्किटे इंदूर येथे पोहचविण्यास मालक मनोज देवासी यांनी ...

थांबलेल्या लक्झरी बसमधून २१ लाखांची चांदीची बिस्किटे चोरीस
गोपाराम देवासी (२४, रा. राजस्थान, ह.मु. हिंगोली) यांना तीस किलो चांदीची बिस्किटे इंदूर येथे पोहचविण्यास मालक मनोज देवासी यांनी सांगितले. त्यानुसार, एका बॅगमध्ये हे बिस्कीट घेऊन ते हिंगोली येथून रेल्वेने अकोला येथे आले. त्यानंतर अकोला येथून १६ रोजी चांदीची बिस्किटे घेऊन ते लक्झरी बसने इंदूरकडे निघाले. बुधवारी रात्री रोजी रात्री १२.३० वाजता मुक्ताईनगरजवळील घोडसगाव फाट्यावर बस थांबली. त्याचवेळी देवासी हे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी खाली उतरले.
परत आले त्यावेळी आपल्याजवळील बॅग चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच हॉटेल मालकाशी संपर्क केला. दोघांनी नंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. दरम्यान, चौकशीसाठी एक पथक अकोल्याकडे रवाना झाले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश सोळंके हे करीत आहेत. देवासी हे जेवणासाठी उतरले त्यावेळी दोन संशयित व्यक्ती तथे फिरत होत्या. अशी माहिती मिळाली.