दूषित पाणी प्यायल्याने 200 मेंढय़ा दगावल्या
By Admin | Updated: March 29, 2017 13:48 IST2017-03-29T13:48:34+5:302017-03-29T13:48:34+5:30
रावेर तालुक्यातील अजंदा येथे अचानक सुमारे 200 पेक्षा जास्त मेंढय़ा दगावल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली.

दूषित पाणी प्यायल्याने 200 मेंढय़ा दगावल्या
ऐनपूर : अंजदा येथील घटनेने खळबळ
ऐनपूर, ता. रावेर, दि. 29- रावेर तालुक्यातील अजंदा येथे अचानक सुमारे 200 पेक्षा जास्त मेंढय़ा दगावल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने पशुपालक धास्तावले आहेत. दरम्यान, दूषित पाणी पिल्याने मेंढय़ा दगावण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मेंढय़ा दगावण्याची घटना घडताच पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.