शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
5
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
6
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
8
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
9
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
10
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
11
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
12
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
13
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
14
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
16
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
17
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
18
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
19
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
20
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात २०० तीव्र कुपोषित बालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:09 IST

जामनेर तालुक्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालक

जळगाव : जिल्ह्यात केवळ तीव्र कुपोषित बालकांना सकस आहार दिला जात असून मध्यम कुपोषित बालक त्यापासून वंचित राहत आहे. असे असले तरी जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या कमी झाली असल्याची बाब आकडेवारीवरून समोर आली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७१५ कुपोषित बालके असून त्यापैकी २०० बालके तीव्र कुपोषित आहेत. यामध्ये जामनेर तालुक्यात ही संख्या सर्वाधिक (३२ बालके) असून पारोळा तालुक्यात सर्वात कमी (२ बालके) आहे.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी विधानभवनात कुपोषणाचा मुद्दा उपस्थित करीत राज्यात युती सरकारच्याच काळात कुपोषणाची तीव्रता वाढल्याचा आरोप करीत सरकारला घरचा आहेर दिला. खडसे यांच्या या आरोपानंतर जिल्ह्यातील कुपोषणाच्या स्थितीचा आढावा घेतला असता गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा निम्म्यावर आला असल्याचे समोर आले.जानेवारी २०१९ ते मे २०१९ या काळात जिल्ह्यात २०० तीव्र कुपोषित बालके आढळून आली. गेल्या वर्षी याच काळात ही संंख्या ४००च्यावर होती. ती या वेळी निम्म्यावर आली आहे. या सोबतच जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या एक हजार ५१५ असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आर.आर. तडवी यांनी दिली.जिल्ह्यात सर्वाधिक तीव्र कुपोषित बालके जामनेर तालुक्यात असून तेथे ही संख्या ३२ आहे. त्या खालोखाल चोपडा तालुक्यात २८ तर चाळीसगाव तालुक्यात १९ तीव्र कुपोषित बालके आहेत. पारोळा तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच दोन कुपोषित बालके आढळून आली.तालुकानिहाय तीव्र कुपोषित बालकेजळगाव - १३जामनेर - ३२मुक्ताईनगर - १८पाचोरा - ६पारोळा - २रावेर - १३यावल - ६अमळनेर - १७बोदवड - १५चाळीसगाव - १९चोपडा - २८धरणगाव - १७एरंडोल - १४एकूण - २००

टॅग्स :Jalgaonजळगाव