विष प्रयोग करून २० जनावरे रस्त्यांवर फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 15:17 IST2019-07-14T15:12:28+5:302019-07-14T15:17:27+5:30

विष प्रयोग करून तब्बल २० जनावरे बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या चार रस्त्यांच्या लगत फेकलेली आढळली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.

20 poisonous animals thrown on the streets by using poison | विष प्रयोग करून २० जनावरे रस्त्यांवर फेकली

विष प्रयोग करून २० जनावरे रस्त्यांवर फेकली

ठळक मुद्देबोदवड तालुक्यातील प्रकारदोन दिवस झाल्याने जनावरे फुगलेल्या अवस्थेतपरिसरात पसरली दुर्गंधीनागरिकांच्या आरोग्यास धोका

गोपाळ व्यास
बोदवड, जि.जळगाव : विष प्रयोग करून तब्बल २० जनावरे तालुक्यातील वेगवेगळ्या चार रस्त्यांच्या लगत फेकलेली आढळली. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.
तालुक्यातील पळासखेडा ते मुक्तळ, मुक्तळ ते मानमोडी, शिंदी, वाकी या रस्त्यांवर ही मृत जनावरे आढळली. यात तरुण बैल व गोºहे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने विष प्रयोग केला असावा आणि अज्ञात वाहनात भरून रस्त्याच्या पलीकडे या जनावरांना फेकले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास ठिकठिकाणी ही जनावरे फेकली असावी. सदर बैलजोड्या ह्या तालुक्यातील पशुधन मालकाच्या नाहीत. ही जनावरे बाहेरगावाहून वाहनात आणून त्यांच्यावर विष प्रयोग करून फेकून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर जनावरे दोन दिवस झाल्याने फुगलेल्या अवस्थेत पडून आहेत. परिणामी परिसरात दुर्गधी पसरली आहे. यातूनच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: 20 poisonous animals thrown on the streets by using poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.