पुन्हा २० मेंढ्यांचा विषबाधेने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 08:35 PM2019-06-20T20:35:01+5:302019-06-20T20:35:07+5:30

भोरटेक शिवार : सलग दुसऱ्या दिवशीच्या घटनेने मेंढपाळ हवालदिल

20 poets die of venom again | पुन्हा २० मेंढ्यांचा विषबाधेने मृत्यू

पुन्हा २० मेंढ्यांचा विषबाधेने मृत्यू

Next


कजगाव, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या भोरटेक शिवारात १९ रोजी ७० मेंढ्या विषबाधेमुळे दगावल्या. त्या दु:खातून मेंढपाळ कुटूंब बाहेर निघत नाही, तोच पुन्हा २० रोजी पुन्हा वीस मेंढ्या व शेळया दगावल्याने या मेंढपाळ कुटूंबाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील पिंपराळा ता. नांदगाव येथील भीमा सोमा शिंदे हे मेंढपाळ आपल्या सह इतर नातेवाईका च्या मेंढ्या व शेळ्या घेऊन चराई साठी आलेले असतांना लागोपाठ दोन दिवसात चक्क नव्वद मेंढ्या व शेळ्या दगावल्याने या कुटूंबाचे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे . लागोपाठ दोन दिवसापासून मेंढ्या व शेळ्या प्राण सोडत असल्याचे पाहून पशुमालका सह कुटुंबातील महिलांनी हंबरडा फोडला. कुठलेतरी गवत व काही कंद खाल्यामुळे दोन दिवसापासून शेळ्या व मेंढ्या दगावत असल्याने मेंढपाळ कुटुंब धास्तावला आहे. सदरील घटनेचा पंचनामा भोरटेक चे तलाठी रत्नदीप माने यांनी केला .
१९ रोजी च्या घटनेमुळे तर मेंढपाळ कुटूंबाच्या वाड्यावर दिवसभर चुलीच पेटल्या नव्हत्या. या घटनेच ची माहिती या मेंढपाळ लोकांच्या गावी नांदगाव तालुक्यात मिळताच साºया नातेवाईकांनी वाड्यावर येऊन भेट देत नुकसानग्रस्त मेंढपाळ लोकांना धीर दिला.
शेळ्या व मेंढ्या दगावत असल्याची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इतर मेंढ्या व शेळ्यांवर प्रथमोपचार केले दरम्यान श१९ रोजी देखील पशुवैद्यकीय पथकाने मोठया प्रमावर उपचार केले होते मात्र याचा काहीसा फायदा झाला नसल्याने आज पुन्हा वीस ते पंचवीस शेळ्या व मेंढ्या दगावल्या. सदर घटना कळताच जि. प.सदस्य रावसाहेब पाटील,भोरटेक चे सरपंच उन्मेष देशमुख सह ग्रामस्थ व शेतकरी मोठया संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते जळगावच्या पशुवैद्यकीय पथकानेही भेट दिली.

Web Title: 20 poets die of venom again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.