रोटरी स्टार्सच्या पदग्रहण सोहळ्यात २० जणांना सदस्यत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:19+5:302021-07-21T04:13:19+5:30

यावेळी नूतन अध्यक्ष नीरज अग्रवाल यांना धनराज कासट यांनी तर नूतन सचिव विपूल पटेल यांना अश्‍विन मंडोरा यांनी ...

20 members at the Rotary Stars inauguration ceremony | रोटरी स्टार्सच्या पदग्रहण सोहळ्यात २० जणांना सदस्यत्व

रोटरी स्टार्सच्या पदग्रहण सोहळ्यात २० जणांना सदस्यत्व

यावेळी नूतन अध्यक्ष नीरज अग्रवाल यांना धनराज कासट यांनी तर नूतन सचिव विपूल पटेल यांना अश्‍विन मंडोरा यांनी पदभार सुपूर्द केला. अध्यक्ष नीरज अग्रवाल यांनी नूतन कार्यकारिणी घोषित केली. कार्यक्रमात रोटरॉक्टचे डी.आर.आय.लोकेश कन्सल यांच्याहस्ते रोटरॉक्ट क्‍लबचे नूतन अध्यक्ष प्रेम सातपुते व सचिव अर्चना पाटील यांना पदाची सूत्रे देण्यात आली.

रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची यांनी मनोगत व्यक्त केले. सहप्रांतपाल डॉ.गोविंद मंत्री यांनी प्रांतपालाच्या संदेशाचे वाचन केले. सूत्रसंचालन गिरीश कुळकर्णी यांनी तर परिचय सृष्टी जैन यांनी करुन दिला. याझविन पेसूना यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोटरी परिवारातील लक्ष्मीकांत मणियार, डॉ. तुषार फिरके, अ‍ॅड. प्रवीणचंद्र जंगले, कॅप्टन मोहन कुळकर्णी, जितेंद्र ढाके, डॉ. अपर्णा मकासरे, डॉ. उषा शर्मा, किशोर सूर्यवंशी, उडान फउंडेशनच्या हर्षाली चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: 20 members at the Rotary Stars inauguration ceremony