जळगावात 20 लाखांचे मोबाईल लंपास
By Admin | Updated: April 7, 2017 13:34 IST2017-04-07T13:34:23+5:302017-04-07T13:34:23+5:30
ही घटना गुरुवारी रात्री घडली असून शुक्रवारी सकाळी ती उघडकीस आली.

जळगावात 20 लाखांचे मोबाईल लंपास
जळगाव, दि. 7 - शहरात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कोर्ट चौकातील जे.टी. चेंबरमधील मोबाईलचे दुकान फोडून सुमारे 20 लाख रुपये किंमतीचे मोबाईल चोरटय़ांनी लंपास केले. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून शुक्रवारी सकाळी ती उघडकीस आली.
शहरातील हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून ज्या दुकानातून हे मोबाईल लंपास झाले आहेत, त्याच्या शेजारीच एटीएमदेखील आहे. या चौकात सतत वाहनांची ये-जा असते व रात्रीच्या वेळीदेखील रेल्वेस्थानकाकडे जाणारी-येणारी वाहने याच मार्गावरून जात असतात. असे असतानादेखील चोरटय़ांनी हे दुकान फोडले.
सकाळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दीदेखील झाली होती.