शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी मंजुर; पायाभूत, शैक्षणिक विकासाच्या होणार सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 22:36 IST

याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी केले जाणार आहे.

भूषण श्रीखंडे -

जळगाव : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला पायाभूत व शैक्षणिक विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. २० रोजी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे डिजिटल लाँचिंग केले जाणार आहे. याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी केले जाणार आहे.

रुसा योजनेचे आता प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानात रूपांतर करण्यात आले असून, देशभरातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांना बळकटी प्राप्त व्हावी यासाठी या योजनेअंतर्गत १२,९३६.१० कोटी रुपये दिले जाणार आहेत. देशभरातील २६ विद्यापीठांना प्रत्येकी १०० कोटी, तर ५२ विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

विद्यापीठात या होणार सुविधाकेंद्राकडून मिळालेल्या निधीतून अत्याधुनिक साधन, सुविधा बांधकामासाठी ९.२८ कोटी, माहिती तंत्रज्ञान सुविधा नूतनीकरण यात तंत्रज्ञान सुविधा, सेमिनार हॉल, ऑनलाइन परीक्षा केंद्र, ई-कंटेंटसाठी स्टुडिओ, दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा यासाठी ३.३५ कोटी, उपकरणांसाठी ५.६५ कोटी, कौशल्य विकास, समुपदेशन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी संवेदना जनजागृती कार्यक्रम, कौशल्य कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्रासाठी १.७० कोटी, असा एकूण २० कोटी रुपयांचा प्रस्ताव या योजनेसाठी विद्यापीठाने दिला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून, यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे. 

टॅग्स :universityविद्यापीठJalgaonजळगाव