शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गिरणेतून चौथे आवर्तन सुटले! २ हजार क्यूसेस पाणी पिण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 17:19 IST

यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई सौम्य आहे. मोजक्याच गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र स्वरुपाची आहे. त्या गावांसाठी चौथे आवर्तन लाभदायी ठरणार आहे.

जळगाव : गिरणा धरणातून रविवारी सायंकाळी चौथे आवर्तन सोडण्यात आले. चौथे आवर्तन बिगरसिंचनासाठी असून त्याचा लाभ १०८ गावांना होणार आहे. रब्बी हंगामासाठी यापूर्वी तीन आवर्तन सोडण्यात आले होते. आता दोन आवर्तन पिण्यासाठी सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार रविवारी चौथे आवर्तन सोडण्यात आले.

या गावांना फायदा

यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई सौम्य आहे. मोजक्याच गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र स्वरुपाची आहे. त्या गावांसाठी चौथे आवर्तन लाभदायी ठरणार आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल व जळगाव तालुक्यातील १०८ गावांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. तसेच भडगाव व पाचोरा पालिका हद्दीतही या पाण्यामुळे टंचाईवर मात करता येणार आहे.

२ हजार क्यूसेस पाणी

चौथ्या आवर्तनामध्ये २ हजार क्यूसेस पाणी सोडले जाणार आहे. तर १४०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असणार आहे. जलसंपदा विभागासोबत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत यंदा पाच आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. पाचवे आवर्तन जून महिन्यात सोडण्यात येणार आहे.चौथे आवर्तन बिगर सिंचनासाठी आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यादृष्टीने आवर्तन सोडण्यात आले आहे. जनतेने पाण्याचा जपून वापर करावा. सिंचनासाठी पाण्याची उचल केली जात असल्याचे लक्षात आल्यावर कारवाई करण्यात येणार आहे.-देवेंद्र अग्रवाल, अधीक्षक अभियंता, गिरणा पाटबंधारे.

टॅग्स :Jalgaonजळगाव