२ हजार ६६५ विद्यार्थी देणार सेट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:30+5:302021-09-21T04:19:30+5:30

जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत जळगाव केंद्रावर घेण्यात येणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय सेट परीक्षेचे ...

2 thousand 665 students will give set test | २ हजार ६६५ विद्यार्थी देणार सेट परीक्षा

२ हजार ६६५ विद्यार्थी देणार सेट परीक्षा

जळगाव : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या मार्फत जळगाव केंद्रावर घेण्यात येणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय सेट परीक्षेचे आयोजन रविवार, दि.२६ सप्टेंबर रोजी करण्यात आले असून, जळगाव केंद्रावर २ हजार ६६५ विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

या सेट परीक्षेचे आयोजन जळगाव शहरातील ०६ परीक्षा केंद्रांवर करण्यात आले आहे. त्यात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय परिसरातील स्वामी विवेकानंद भवन-अ (केंद्र सांकेतांक क्र. १४०१), स्वामी विवेकांनद भवन-ब ( केंद्र सांकेतांक क्र.१४०२), खान्देश एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर (केंद्र सांकेतांक क्र.१४०३), खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्र.१४०४), के.सी.ई.चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्र.१४०५) आणि ॲड. सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालय (केंद्र सांकेतांक क्र.१४०६) या केंद्रांचा समावेश आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करताना काही अडचणी आल्यास प्रभारी कुलसचिव डॉ. शा.रा. भादलीकर यांच्या भ्रमणध्वनी किंवा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

Web Title: 2 thousand 665 students will give set test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.