काव्यरत्नावली चौकात २ हजार ५१३ श्रीमूर्ती संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 06:52 PM2020-09-02T18:52:59+5:302020-09-02T18:53:45+5:30

प्रतिसाद : युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचा उपक्रम

2 thousand 513 idols collected at Kavyaratnavali Chowk | काव्यरत्नावली चौकात २ हजार ५१३ श्रीमूर्ती संकलित

काव्यरत्नावली चौकात २ हजार ५१३ श्रीमूर्ती संकलित

Next

जळगाव : युवाशक्ती फाउंडेशन व भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काव्यरत्नावली चौक येथे शहरातील सर्वात मोठे गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. मंगळवारी दिवसतभरात २ हजार ५१३ श्रीमूर्तींचे संकलन करण्यात येवून त्यांचे विसर्जन करण्यात आले.
पहिली मूर्ती सकाळी ७ वाजता रमेश पाटील या कुटूंबाकडून आली व शेवटची मूर्ती रात्री ९.१५ राजेश जावहाराणी कडून आली. एकूण २ हजार ५१३ श्रीमूर्ती संकलन झाल्या. संकलित मूर्तींचे विधिवत विसर्जन मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाउंडेशनचे स्वयंसेवकांकडून करण्यात आले.
केंद्रावर विसर्जन आरती व श्रीफळ फोडण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती़ यासह मूर्ती देण्यासाठी आलेल्या सर्वांची नावनोंदणी केली जात होती. दिवसभरात १ ट्रक, ३ ट्रॅक्टर व २ डंपरच्या एकूण १९ चक्कर काव्यरत्नावली ते मेहरूण तलाव येथे करण्यात आल्या.

केंद्राकडे जिल्हाधिकारींनी दिली श्रीमूर्ती
सकाळी १० वाजता स्वत: जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांच्या घराचा गणपती या ठिकाणी संकलित केला. पहिल्या चक्कर मधील ट्रकचे २२३ गणपती मेहरूण तलावावर स्वत: जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, मनपा आतुक्त सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधीक्षक नीळभ रोहन यांनी उतरवल्या. शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मूर्ती संकलित केल्या.

यांनी घेतले परिश्रम
यशश्वीतेसाठी युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, सचिव अमित जगताप, प्रीतम शिंदे, पियुष हसवाल, अर्जुन भारुळे, पियुष तिवारी , दर्शन भावसार, आकाश वाणी, करण शहा, भवानी अग्रवाल, तृषान्त तिवारी, सागर सोनवणे, जयेश पवार, अनिमेश मुंदडा, ऋषिकेश जाखेटे, कन्हैया सोनार, पवन चव्हाण, संदीप सूर्यवंशी, यश ठाकरे, अमोल गोपाळ, राहुल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

 

Web Title: 2 thousand 513 idols collected at Kavyaratnavali Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.