मनपाच्या सहापैकी २ लिफ्ट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:37+5:302021-07-22T04:12:37+5:30

जळगाव : महापालिकेच्या मुख्य इमारतीत सहा कोटी रुपयांचा खर्च करून, ६ नव्या लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. मात्र, काही महिन्यांतच ...

2 out of 6 lifts of Corporation started | मनपाच्या सहापैकी २ लिफ्ट सुरू

मनपाच्या सहापैकी २ लिफ्ट सुरू

जळगाव : महापालिकेच्या मुख्य इमारतीत सहा कोटी रुपयांचा खर्च करून, ६ नव्या लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. मात्र, काही महिन्यांतच या लिफ्टमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असून, सद्यस्थितीत मनपातील ६ पैकी केवळ २ लिफ्ट सुरू आहेत. यामुळे मनपात येणाऱ्या नागरिकांची तर गैरसोय होतेच. मात्र, एका लिफ्टमध्ये सहापेक्षा अधिक नागरिक एकाच वेळी जात असल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडत आहे. मनपा प्रशासन मात्र मक्तेदाराला अभय देण्याचे काम करत आहे.

मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात दोन जखमी

जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत जात असून, बुधवारी शहरातील राजाराम व महादेव नगर भागात मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा समावेश आहे, तर दुसऱ्या २० वर्षीय मुलाला कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या भागातून वाहने चालवितानाही कुत्रे पाठलाग करत असल्याने, राजाराम नगर, कानळदा रस्त्याकडून मार्ग काढणे कठीण झाले आहे.

आगामी आठवडा पावसाचा

जळगाव : जिल्ह्यासह शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे, तसेच शेतकरीही आनंदात आहे. दरम्यान, आगामी आठवडा हा पावसाचा राहणार असून, मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

आव्हाणे फाट्याजवळ अपघात

जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील फाट्याजवळ मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकी एकमेकांसमोर धडकल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये आव्हाणे गावातील दोन युवक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुख्य कानळदा रस्त्यादरम्यान आव्हाणे फाट्याजवळ गतिरोधक बसविण्यात यावा, अशी मागणी आव्हाणे ग्रामस्थांकडून केली जात आहे.

---

Web Title: 2 out of 6 lifts of Corporation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.