रावेर दंगल प्रकरणी आणखी ९ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 20:32 IST2020-03-31T20:31:52+5:302020-03-31T20:32:11+5:30
तीन दिवसांची पोलीस कोठडी

रावेर दंगल प्रकरणी आणखी ९ अटकेत
रावेर : येथील दंगल प्रकरणी सोमवारी रात्री मध्य प्रदेशातील ईच्छापूर येथून ताब्यात घेतलेल्या इल्या याकूब चौधरी वगैरे ९ आरोपींना अटक करून रावेर न्यायालयात हजर केले असता न्या. आर. एल. राठोड यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील ३२ आरोपींना परस्पर गटांविरोधी दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यात वर्ग करून तसेच होमगार्ड निलेश जगताप यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी शेख अशफाक अहमद नजीर अहमद वगैरे दोन्ही आरोपींनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. प्रविण वारूळे, तपास अधिकारी फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व फौजदार मनोज वाघमारे यांनी बाजू मांडली. दरम्यान दंगलीत काहींची नावे गोवण्याचा प्रयत्न होत असल्याने परिसरातील अनेक जण गाव सोडून नातेवाईकांकडे गेल्याचे सांगण्यात येत आहे.