शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जळगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 197 अजर्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 12:46 IST

आता छाननीकडे लक्ष : वराड व सावखेडे गावाचे सरपंच बिनविरोधची शक्यता

ठळक मुद्दे25 रोजी छाननी  शेवटच्या दिवशी 130 अर्ज दाखल    सरपंच पदासाठी 36 अर्ज दाखल

ऑनलाईन लोकमत 

जळगाव : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर एकूण 197  अर्ज दाखल झाले. यामध्ये सदस्य पदासाठी 161 तर सरपंच पदासाठी 36 अर्ज दाखल झाले.   दरम्यान, वराड बुद्रुक व सावखेडा खुर्द येथील सरपंचपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने त्या ठिकाणी सरपंच निवड बिनविरोध मानली जात आहे. मात्र छाननीमध्ये काय होते, याकडे लक्ष लागलेले आहे.    

अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया  15 सप्टेंबर पासून सुरू झाली होती. मात्र पितृपक्षाममुळे त्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील निवडणूक कक्षाकडे कोणी फिरकलेच नव्हते.  19 रोजी भोलाणे सरपंचपदासाठी 1 अर्ज दाखल झाला होता. 20 रोजी सदस्य पदासाठी सहा तर सरपंच पदासाठी चार असे एकूण 10 , 21 रोजी सदस्य पदासाठी 40 तर सरपंच पदासाठी 16 असे एकूण 56 अर्ज दाखल झाले होते.  सात दिवसात केवळ 67 अर्ज दाखल झाले असताना शेवटच्या एका दिवसात 130 अर्ज दाखल झाले. यामध्ये सदस्य पदासाठी 115 तर सरपंचपदासाठी 15 अर्ज दाखल झाले.     

25 सप्टेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून नामनिर्देशनपत्र माघारीची मुदत 27 सप्टेंबर आहे. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी  मतदान होऊन 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल व त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल.       

 वराड व सावखेडा सरपंच बिनविरोध !  तालुक्यातील वराड बु. व सावखेडा खु. येथील सरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आला. यामध्ये वराड बु. सरपंच पदासाठी उखा किसन मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध मानले जात आहे.    

 छाननीकडे लक्ष  25 सप्टेंबर रोजी दाखल अर्जाची छाननी होणार असल्याने यामध्ये वराड व सावखेडे येथील सरपंच पदासाठी दाखल अर्जाचे काय होते याकडे आता लक्ष लागलेले आहे. यामध्ये हे दोघेही अर्ज वैध ठरले तर हे दोघेजण बिनविरोध सरपंच ठरू शकतात.    

वराड बु. व सावखेडा खु. येथील सरपंचपदासाठी केवळ एक-एक अर्ज दाखल झाल्याने तेथील सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध मानली जात असली तरी छाननीमध्ये काय होते, यावर सर्व अवलंबून आहे.   - अमोल निकम, तहसीलदार, जळगाव