19 हजारांचे गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 00:17 IST2017-04-05T00:17:37+5:302017-04-05T00:17:37+5:30

किनगाव : महिलेसह तिघांवर गुन्हा

19 thousand kilograms of raw chemicals destroyed | 19 हजारांचे गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट

19 हजारांचे गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट

यावल : तालुक्यातील किनगाव येथील जुन्या आडगाव रस्त्यावरील प्रकाश पाटील यांच्या शेताजवळ तीन संशयितांचे 19 हजार 200 रुपये किमतीचे  गावठी दारू गाळण्याचे  कच्चे रसायन यावल येथील  पोलीस पथकाने नष्ट केल्याची कारवाई केली.   मुंबई पोलीस अधिनियमान्वये एका महिलेसह दोन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  
येथील पोलीस ठाण्याचे फौजदार अशोक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तालुक्यातील किनगाव येथील जुन्या आडगाव रस्त्यावरील  प्रकाश पाटील यांच्या शेताजवळ गावठी दारूचे कच्चे रसायनाचे 200 लीटर क्षमतेचे दोन पत्री ड्रम नष्ट केले आहे. किनगाव येथील एका महिलेसह भैया अमीर पटेल व गंभीर पटेल यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पथकात अशोक अहिरे, कॉन्स्टेबल संजीव चौधरी, विकास सोनवणे, सुशील घुगे, ईश्वर भालेराव यांचा समावेश  होता.

Web Title: 19 thousand kilograms of raw chemicals destroyed