१८ लाखात शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 21:37 IST2017-04-03T21:37:32+5:302017-04-03T21:37:32+5:30
केळी उत्पादकाकडून केळी खरेदी करण्याचा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना नसतांना सावदा येथील राजलक्ष्मी केला

१८ लाखात शेतकऱ्यांची फसवणूक
यावल : केळी उत्पादकाकडून केळी खरेदी करण्याचा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना नसतांना सावदा येथील राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळू पुंडलिक साळी व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद या दोघांनी १० मार्च ते मे २०१६ या कालावधीत तालुक्यातील सातोद व कोळवद येथील सात केळी उत्पादकांकडील केळी खरेदि करून त्यांची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. शेतक-यांनी सर्व संबधिताकडे वारंवार पाठपुरावा केल्यांनतर येथील बाजार समीतीच्या वतीने दोघावर शेतक-यांच्या फसवणूकीसह विश्वासघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
यावल बाजार समितीचे सचिव स्वप्नील सानेवणे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सावदा येथील राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळू पुंडलिक साळी व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद फिरके यांनी सातोद व कोळवद येथील सात शेतकऱ्यांकडून मार्च ते मे २०१६ या काळात सात केळी उत्पाकांकडील केळी खरेदी करून त्यांची १७ लाख ९९ हजार २२३ रुपयांची फसवणूक केली आहे. सातोद व कोळवद ही गावे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील आहेत. संबधित व्यापरी यांनी कोणताही परवाना नसतांना तालुक्यातील केळी उत्पादकांची फसवणूक केली आहे. विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून २५ नोव्हेंबर २०१६ रोजी संबधित व्यापाऱ्यास रजिस्टर पोष्टाने नोटीस जारी करण्यात आली होती शिवाय रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती क्षेत्रातील व्यापरी असल्याने रावेर बाजार समितीतर्फेही दप्तर तपासणीस उपलब्ध्द करून देण्याचे लेखी कळविले होते मात्र संबधितांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यानुसार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४१७, ४२० सह ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक अहिरे व संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.