शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठी १ हजार ७०० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST

जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे अडीच ...

जळगाव : दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार जागांसाठी १ हजार ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी ९८० अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया समन्वयक पी.पी.गडे यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात पॉलिटेक्निकची १३ तर फार्मसीची १३ अशी एकूण २५ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयात प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेशासाठीची प्रक्रियेला ३० जूनपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्याबाबत सविस्तर वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले होते. त्यातच विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करता येणार आहे.

१३ एफसी केंद्रांमार्फत अर्जांची तपासणी

प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्राप्त होणा-या अर्जांची पडताळणी करण्‍यासाठी १३ एफसी केंद्र सुरू करण्‍यात आली. आतापर्यंत १ हजार ७०० अर्ज जिल्हाभरातून प्राप्त झाले आहे. त्यापैकी ९८० अर्जांची एफसी केंद्रांमार्फत पडताळणी झाली आहे. विशेष म्हणजे, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना शाळेचा दाखला व निकालाची आवश्यकता नाही. सदर विद्यार्थ्यांचे गुण हे थेट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बोर्डाकडून घेवून गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.

असा भरता येणार अर्ज

सीबीएसई व इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ नोंदणी करता येत आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांना संपूर्ण अर्ज भरता येणार आहे.

असे आहे वेळापत्रक

प्रवेश अर्ज नोंदणी : ३० जून ते ३० जुलै

प्रवेशासाठी कागदत्रांची पडताळणी व निश्चिती : ३० जून ते ३० जुलै

तात्पुरता गुणवत्ता यादी : २ ऑगस्ट

अर्ज दुरूस्त करणे : ३ ते ५ ऑगस्ट

अंतिम गुणवत्ता यादी : ७ ऑगस्ट