जळगाव : मोबाईलवर बोलत असतानाच किर्ती पवन दुसाने (वय १७) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता मेहरुणमधील रामनगरात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, किर्ती ही मेहरुणमधील श्रीराम कन्या शाळेत दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मंगळवारी ती शाळेत गेलेली नव्हती. वडील पवन दुसाने व आई भारती दोन्ही जण कामावर गेलेले होते. त्यामुळे किर्ती व लहान भाऊ लोकेश असे दोघेच घरी होते. दोघांनी दीड वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर लोकेश बाहेर गल्लीत खेळायला निघून गेला. दुपारी अडीच वाजता तो घरी आला असता दरवाजाची कडी आतून बंद होती. खिडकीद्वारे डोकावून पाहिले असता किर्तीने गळफास घेतला होता.वडील सोनार काम करतात तर आई कंपनीत कामाला जाते. भाऊ आठवीत शिक्षण घेत आहे.
जळगावातील रामनगरात १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 17:29 IST
मोबाईलवर बोलत असतानाच किर्ती पवन दुसाने (वय १७) या अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजता मेहरुणमधील रामनगरात घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील रामनगरात १७ वर्षीय मुलीची आत्महत्या
ठळक मुद्दे राहत्या घरात घेतला गळफासकारण अस्पष्ट भावानेच उतरविला मृतदेह खाली