१६ हजार शेतकर्‍यांना फटका

By Admin | Updated: February 13, 2015 15:32 IST2015-02-13T15:32:41+5:302015-02-13T15:32:41+5:30

जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी दहा तालुक्यातील १७ हजार १२९ हेक्टरला फटका बसला आहे.

16 thousand farmers hit | १६ हजार शेतकर्‍यांना फटका

१६ हजार शेतकर्‍यांना फटका

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील १५ पैकी दहा तालुक्यातील १७ हजार १२९ हेक्टरला फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी, केळी आदी पिकांचे सुमारे दोन कोटी ७ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल सहाशे गावातील १६ हजार ८0७ शेतकर्‍यांना फटका बसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किसन मुळे यांनी सांगितले.
सर्वाधिक नुकसान धरणगाव तालुक्यात
अवकाळी पावसानंतर लागलीच दुसर्‍या दिवशी कृषि विभागातर्फे पंचनामे करण्यात आले. यात सर्वाधिक फटका हा धरणगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाचे कोणतेही आदेश प्रशासनाला अद्याप मिळालेले नाहीत. 
गहू व मक्याचे प्रचंड नुकसान
सर्वाधिक तडाखा गहू व मक्याला बसला आहे. जिल्ह्यातील ९ हजार ४३८ हेक्टरवरील गहू तर सहा हजार ९0 हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. 
आठवडाभरात निर्णय- कृषिमंत्री
धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना शासनाने निश्‍चित केलेल्या निकषानुसार नुकसानग्रस्तांना भरपाईदिली जाईल. पंचनामे तीन दिवसात आटोपतील. लागलीच भरपाईदेखील दिली जाईल. परंतु नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना कर्जव इतर मद्दय़ांबाबत आणखी काही सवलती द्यायच्या का? यासंदर्भात मंत्रीमंडळासमोर चर्चाकरून आठवडाभरात निर्णय घेतला जाईल, असे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 
शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

Web Title: 16 thousand farmers hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.