१६ हजार जात प्रमाणपत्रे पडून
By Admin | Updated: November 20, 2014 13:33 IST2014-11-20T13:33:53+5:302014-11-20T13:33:53+5:30
जात पडताळणी कार्यालयात तब्बल १६ हजार जात प्रमाणपत्रे अक्षरश: पडून आहेत.

१६ हजार जात प्रमाणपत्रे पडून
धुळे : जात पडताळणी कार्यालयात तब्बल १६ हजार जात प्रमाणपत्रे अक्षरश: पडून आहेत. विद्यार्थ्यांनी त्रुटींची पूर्तता केल्यास त्यांना ३0 नोव्हेंबरपर्यंत जातवैधता प्रमाणपत्रे देण्यात येतील, अशी माहिती विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ यांनी दिली.
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ३0 नोव्हेंबरपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र हवे आहे. या मुदतीत ते सादर केले जाईल, असे प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयांकडे सादर केले आहे.
ते मुदतीत मिळाले नाही, तर संबंधित विद्यार्थ्यांना खुल्या जागेतील प्रवेश स्वीकारावा लागेल आणि त्यानुसार शुल्क भरावे लागेल, अशी भीती व्यक्त करीत काही पालकांनी 'लोकमत'कडे दूरध्वनीद्वारे ही कैफियत मांडली.
----------
पारोळा रोडलगत असलेल्या या समिती कार्यालयात काही महिन्यांपासून तयार तब्बल १६ हजार जात पडताळणी व वैधता प्रमाणपत्रे पडून आहेत. खान्देशातून संबंधित कुणीही व्यक्ती ते घेण्यासाठी आलेल्या नाहीत. तरीही समिती टीकेची धनी होते, असे गुंजाळ, अधिकारी राकेश पाटील यांनी सांगितले. नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी दाखल प्रकरणातील त्रुटी दूर केल्या, म्हणजेच महसुली कागदपत्रे, पुरावे लवकर सादर केल्यास त्यांना जातवैधता प्रमाणपत्रे दिली जातील, असेही समितीने म्हटले आहे.