शाळांच्या विकासासाठी सीईओंचा १६ कलमी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:13+5:302021-07-28T04:18:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सर्व सुविधा तसेच शाळांचा विकास साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ...

शाळांच्या विकासासाठी सीईओंचा १६ कलमी कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना सर्व सुविधा तसेच शाळांचा विकास साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १६ कलमी कार्यक्रम हातात घेतला असून या पार्श्वभूमीवर या १६ विशिष्ट बाबींची शाळांकडून या आठवडाभरात माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर यावर काम होणार आहे. त्यात पंधराव्या वित्त आयोगातून शाळांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
शाळांकडून येत्या शुक्रवारपर्यंत माहिती मागविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी सांगितले. यात शाळांचे रूप पालटण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच त्यांना उत्तम वातावरणात चांगले शिक्षण मिळावे यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आहेत १६ बाबी...
हॅण्डवॉश स्टेशन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रंथालय, किचन गार्डन, इंटरनेट, संगणक, लॅपटॉप, वर्ग खोल्या दुरुस्ती, विद्युतीकरण, वृक्षलागवड, बायोमेट्रिक प्रणाली, सोलर लाइट, शैक्षणिक सॅाफ्टवेअर, शाळांना वॉल पेंटिंग या बाबी कुठल्या शाळेत आहेत व कुठल्या शाळेत नाहीत याची माहिती प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तातडीने मागविण्यात आली आहे. यानुसार पुढील महिन्यांपासून यावर काम होणार आहे.