जिल्ह्यासाठी १५ हजार मेट्रिक टन युरियाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:04+5:302021-06-26T04:13:04+5:30

जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मागील व आताचे असे एकूण ७२.२६८ मेट्रिक टन युरिया खते विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ...

15,000 metric tons of urea planned for the district | जिल्ह्यासाठी १५ हजार मेट्रिक टन युरियाचे नियोजन

जिल्ह्यासाठी १५ हजार मेट्रिक टन युरियाचे नियोजन

जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मागील व आताचे असे एकूण ७२.२६८ मेट्रिक टन युरिया खते विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यात जूनअखेर ५५.९७२ मेट्रिक पुरवठा करण्यात येणार आहे. मागील रबी हंगामातील २६.०७० मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे. तसेच एप्रिल मे आणि २१ जूनपर्यंत ४६.१९८ मेट्रिक टन पुरवठा झाला आहे. त्यामुळे आता ७२ मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. तसेच १५ हजार मेट्रिक टन युरियाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात सर्व खते उपलब्ध असून दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले असून त्याप्रमाणे पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॅगवरील निर्धारित दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करू नये, जादा दराने विक्री होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी केले आहे.

अशी आहे खतांची उपलब्धतता

जून महिनाअखेर आर.सी.एफ.कडून ५ हजार मेट्रिक टन. एन.एफ.एल.मार्फत २ हजार ६०० मे. टन. इफकोमार्फत २ हजार ६०० आणि आयपीएलमार्फत ४ हजार ८०० असे एकूण १५ हजार मेट्रिक टन युरिया खत पुरवठ्याचे नियोजन आहे. एसएसपी खताचा देखील २२.०४४ मेट्रिक टन एमओपी खताचा १९.३८६ मेट्रिक टन डीएपीचा ३३२९ व इतर संयुक्त खतांचा पुरवठा ३१ हजार ३१ मेट्रिक टन एवढा आहे.

Web Title: 15,000 metric tons of urea planned for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.