१५ वर्षीय मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 22:10 IST2020-06-15T22:10:11+5:302020-06-15T22:10:18+5:30

वासरे येथील घटना : नववीचा होता विद्यार्थी, कारण गुलदस्त्यात

15-year-old boy commits suicide | १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

१५ वर्षीय मुलाची आत्महत्या

अमळनेर : तालुक्यातील वासरे येथील १५ वर्षीय मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंदन विजय पाटील असे या मुलाचे नाव असून सदर घटना घडली तेव्हा मुलाचे आई -वडील शेतात गेले होते.
सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घराजवळ राहणारा दीपक पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आली असता त्याने तत्काळ पोलिस पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर चंदनला ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
चंदन हा नववीच्या वर्गात शिकत होता.
पोलिस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांनी खबर दिल्यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
सदर घटनेचा तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहेत. तर एवढया लहान मुलाने आत्महत्या का केली असावी याबाबत गावात चर्चा असून कारण काय असावे? याचेच आश्चर्य ग्रामस्थांना वाटत आहे. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: 15-year-old boy commits suicide