कन्नड घाटात १५ ठिकाणे ‘डेंजर झोन’ मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST2021-09-04T04:20:45+5:302021-09-04T04:20:45+5:30
जिजाबराव वाघ चाळीसगावः मंगळवारी कन्नड घाटात अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी दरडी कोसळून भूस्सखलनही झाले. यामुळे घाटात त्या ‘काळरात्री’ ५० ते ...

कन्नड घाटात १५ ठिकाणे ‘डेंजर झोन’ मध्ये
जिजाबराव वाघ
चाळीसगावः मंगळवारी कन्नड घाटात अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी दरडी कोसळून भूस्सखलनही झाले. यामुळे घाटात त्या ‘काळरात्री’ ५० ते ६० वाहने अडकून पडली होती. एनडीआरएफच्या टीमसह महामार्ग पोलिसांनी ही वाहने गुरुवारपर्यंत हटवून काही प्रमाणात रस्ता मोकळा आहे. अजूनही १० ते १५ दिवस येथून वाहतूक सुरू होऊ शकणार नाही. दरड कोसळल्याने घाटातील १५ ठिकाणे डेंजर झोन झाली आहेत.
धुळे-सोलापूर २११ राष्ट्रीय महामार्गावर चाळीसगाव शहरापासून दक्षिणेला १० किमी अंतरावर कन्नड घाटाला सुरुवात होते. गेल्या काही वर्षात घाटात वाहतुकीचा खोळंबा होण्याचे प्रकार वाढले आहे. वाहनांचा चक्काजाम झाल्याने रस्त्यात दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे घाटाचे दुखणे ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असे झाले आहे. मंगळवारी मध्यरात्री घाटावर आभाळच फाटल्याने दरड कोसळल्या. ठिकठिकाणी रस्ता खचला. वाहून आलेला गाळ आणि त्यावर दगडांचा थर साचल्याने बुधवार पासून वाहतूक बंद करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांनी बुधवारी तातडीने घटनास्थळाचा सर्व्हे करून १५ ठिकाणांचा कोसळू शकणारा दगड काढून टाकण्याचे प्रस्तावित केले आहे.
कोट
बुधवारी घाटात घटनास्थळी जाऊन सर्वेक्षण केले आहे. १० ते १५ दिवसानंतर वाहतूक सुरळीत होऊ शकते. रस्ता खचलेल्या ठिकाणी भिंती बांधण्याचे काम तातडीने प्रस्तावित केले आहे. बोगद्याचा डीपीआर दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे दाखल आहे.
- महेश पाटील तांत्रिक प्रबंधक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, औरंगाबाद