डेंग्यूचे १४८ संशयित, चिकुनगुनियाचे २ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:40+5:302021-09-17T04:20:40+5:30
शहरात अन्य आजारांनी काढले डोके वर : सप्टेंबरमध्येच संख्या वाढली आनंद सुरवाडे जळगाव : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून ...

डेंग्यूचे १४८ संशयित, चिकुनगुनियाचे २ बाधित
शहरात अन्य आजारांनी काढले डोके वर : सप्टेंबरमध्येच संख्या वाढली
आनंद सुरवाडे
जळगाव : गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून यासह विविध विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडीत गर्दी वाढली आहे. शहरात सप्टेंबर महिन्यात १४८ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर २ रुग्णांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचे खासगी रुग्णातयातील तपासणीतून समोर आले आहे.
जळगाव शहरात गेल्या दोन महिन्यात अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्या सप्टेंबर महिन्यात जळगाव शहरात अधिक संशयित रुग्ण असल्याची माहिती महापालिकेकडून मिळाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत ३७६ संशयित रुग्ण होते. त्यापैकी ८ बाधित आढळून आले होत. तर सप्टेंबर महिन्यात अद्याप एकही रुग्ण नसून अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही. या अहवालांची धुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी होत असते.
काय आहेत लक्षणे?
डेंग्यू : डेंग्यू हा दोन प्रकारचा असतो. यात एक प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असतो. यात सामान्यपणे ताप येणे, मळमळ, उलट्या, रक्ताच्या उलट्या, मेंदूत ताप जाणे, अंगावर पुरळ येणे, डोके दुखणे अशक्तपणा ही लक्षणे असतात.
चिकुनगुनिया : या विशेषता सांधेदुखीचा त्रास अधिक असतो. यासह डोकेदुखी, पाठदुखी, अशक्तपणा, ताप येणे आणि मळमळ होणे ही साधारण लक्षणे असतात.
काविळ : अशक्तपणा येणे, डोळे पिवळे होणे, लघवी पिळवी होणे, भूक मंदावणे, मळमळ होणे, उलट्या होणे ही काविळची लक्षणे असतात.
६० टक्के रुग्णांना सर्दी खोकला, ताप
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडीत तपासणीला येणाऱ्या ६० टक्के रुग्णांना सर्दी, खोकला व ताप ही लक्षणे आढळून येत आहेत. यातील २० टक्के रुग्णांना डेंग्यूसदृश लक्षणे असल्याने त्यांना डेंग्यूसंदर्भातील विविध तपासण्या करायला सांगितल्या जातात.
पांढऱ्या पेशी होताय कमी
मोठ्या प्रमाणेच लहानमुलांमध्येही व्हायरल इंफक्शनचे प्रमाण वाढले आहे. यात विविध विषाणूजन्य आजारांमुळे पांढऱ्या पेशी कमी होण्याचे रुग्णांमध्ये प्रमाण वाढत आहेत. शरीरातील व्हीटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शिवाय रक्तक्षयामुळेही हे प्रमाण कमी होत असते. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, डेंग्यूसदृश रुग्णांची अधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोट
डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. आम्ही अशा रुग्णांना तातडीने रक्ततपासणी करण्याच्या सूचना देत आहोत. यासह अन्य विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. डेंग्यूत प्लेटलेट्स कमी झाल्यास गंभीर परिणाम समोर येऊ शकतात. त्यामुळे तातडीने निदान व योग्य औषधोपचार घेणे गरजेचे आहे. - डॉ. भाऊराव नाखले, विभाग प्रमुख, मेडिसिन
डेंग्यू : १४८ संशयित
चिकुनगुनिया २ बाधित