भुसावळ मंडळातील १४ रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 02:08 PM2020-05-22T14:08:50+5:302020-05-22T14:09:37+5:30

भुसावळ , जि.जळगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे आरक्षण कार्यालय हे बंद करण्यात आले होते आणि आता रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार ...

 14 Railway Reservation Offices in Bhusawal Mandal started | भुसावळ मंडळातील १४ रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू

भुसावळ मंडळातील १४ रेल्वे आरक्षण कार्यालये सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे आरक्षणधारकांनी आपले आरक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई करू नये आरक्षण तिकिटांचा परतावा हा सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंत दिला जाईल

भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे आरक्षण कार्यालय हे बंद करण्यात आले होते आणि आता रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार हे आरक्षण कार्यालय २२ मे पासून भुसावळ मंडळातील १४ आरक्षण कार्यालय आपल्या वेळेनुसार सुरू करण्यात येतील. आरक्षण तिकीट रद्द करण्याची प्रक्रियाही दि.२५ पासून सुरू होईल.
भुसावळ विभागात
भुसावळ-२, जळगाव-२, चाळीसगाव-१, अकोला-२, खंडवा -१, बºहाणपूर-१, मनमाड-१, नाशिक-२, अमरावती-२ अशा तिकीट खिडक्या चालू राहणार आहेत.
आरक्षणधारकांनी आपले आरक्षण तिकीट हे रद्द करण्यासाठी घाई करू नये की त्यामुळे गर्दी होऊ शकते आणि आरोग्याचा धोका होऊ शकतो. ज्या प्रवाशांच्या गाड्या रद्द झाल्या आहे त्या प्रवाशांचे आरक्षण तिकिटांचा परतावा हा सहा महिन्यांच्या मुदतीपर्यंत दिला जाईल. त्यामुळे त्यांनी स्टेशनवर साथ गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title:  14 Railway Reservation Offices in Bhusawal Mandal started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.