शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ३ वर्षात २५६८ अपघातात १३१५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 12:10 IST

जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची दैना, समांतर रस्त्यांचा अभाव आणि वाहतूक नियमांची पायमल्ली

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यात २०१५ मध्ये झाले सर्वाधिक अपघात२०१६ मध्ये जिल्ह्णात एकूण ८३७ अपघात ४२५ जणांचा मृत्यूरस्ते व महामार्गाची झालेली दैना, समांतर रस्त्यांचा अभाव, भरधाव वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली ही अपघाताची प्रमुख कारणे

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१९ : २०१५ ते २०१७ या तीन वर्षात जिल्ह्यात २ हजार ५६८ अपघात झाले असून त्यात १ हजार ३१५ जणांचा मृत्यू तर २ हजार ६८६ वाहनधारक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.रस्ते व महामार्गाची झालेली दैना, समांतर रस्त्यांचा अभाव, भरधाव वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली यासह विविध कारणांमुळे शहर व ग्रामीण भागात दररोज अपघात होत आहे. राष्टÑीय महामार्ग क्रमांक सहा व औरंगाबाद महामार्ग तर मृत्यूचा सापळा बनला आहे.२०१६ मध्ये ८ ३७ अपघात२०१६ मध्ये जिल्ह्णात एकूण ८३७ अपघात झाले. त्यात ४२५ जणांचा मृत्यू तर ७७९ जण जखमी झाले. त्यात ५६१ जणांना गंभीर दुखापत झाली. याही वर्षी मे मध्ये ९६ अपघात झाले त्यात ६० जणानी जीव गमवला.मे महिन्यात सर्वाधिक अपघात२०१५, २०१६ या वर्षाप्रमाणेच २०१७ मधील मे महिन्यात सर्वाधिक ८६ अपघात झाले, त्यात ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०१७ या वर्षात एकूण ८३१ अपघात झाले त्यात ४२२ जणांचा मृत्यू तर ९३८ जण जखमी झाले.२०१५ मध्ये सर्वाधिक अपघातगेल्या तीन वर्षात जिल्ह्णात किती अपघात झाले याबाबत माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१५ मध्ये सर्वाधिक ९०० अपघात झाले. त्यात ४६८ जणांचा मृत्यू तर ९६९ जण जखमी झाले. जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यातील प्रत्येक महिन्यात किमान ५० च्या वर अपघात झाले आहेत. मे महिन्यात सर्वाधिक ११२ अपघात झाले.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघात