शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
6
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
7
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
8
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
9
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
10
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
11
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
12
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
13
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
14
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
15
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
16
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
17
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
18
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
19
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
20
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

१३ हजार रूग्णांची कोरोनावर मात तर ११०० पेक्षा अधिक रूग्ण होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:32 IST

दिलासादायक : कोरोनाच्या ८५ हजारांहून अधिक चाचण्या

जळगाव : सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला जरी असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे़ त्यात मंगळवारपर्यंत १३ हजार १७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्कयांपर्यंत पोहोचले आहे. सध्या ५ हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी गृह अलगीकरणात १ हजार १०१ पॉझिटिव्ह रुग्ण असून जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजारपेक्षा अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या २ हजारापेक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआर व रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात येत असून आतापर्यंत ८५ हजार ८४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ६४ हजार ४७७ चाचण्या निगेटिव्ह तर १९ हजार ८२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत तर ६९१ अहवाल प्रलंबित आहेत.९५ रूग्ण आयसीयूमध्ये़़़जिल्ह्यात सध्या ५ हजार २२८ बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ३ हजार १६३ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ३६९, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५९५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १ हजार १०१ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षात ३७८ रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 4 हजार 264 रुग्ण असून लक्षणे असलेले ९६४ रुग्ण आहेत. त्यापैकी ४३१ रुग्णांना आॅक्सिजन वायू सुरु असून ९५ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.मंगळवारपर्यंतची अशी आहे आकडेवारीमंगळवारी एका दिवसात ४९८ पॉझिव्टिह रुगण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या १९ हजार ८२ इतकी झाली आहे. यापैकी १३ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून मंगळवारपर्यंत ६७८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा ३़५५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे.कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ७५६ ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १ हजार ६०, शहरी भागातील ९४२ तर जळगाव महापालिका क्षेत्रातील ७५४ ठिकाणांचा यामध्ये समावेश असल्याचे डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल आॅफिसर कोविड-१९, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव