पारोळा येथे झोक्याचा फास लागून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 13:44 IST2018-01-10T13:43:48+5:302018-01-10T13:44:45+5:30

कुटुंबावर संकट

13-year-old son dies | पारोळा येथे झोक्याचा फास लागून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

पारोळा येथे झोक्याचा फास लागून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

ऑनलाईन लोकमत

पारोळा, जि. जळगाव, दि. 10 - झोका खेळत असताना अचानक गळ्य़ाला  पीळ बसून पवन कैलास माळी (13) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पारोळा येथे घडली. 
पवन हा झोक्यावर बसून गोल फिरत होता. त्यावेळी गळ्य़ार्पयत पीळ आला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्या वेळी या मुलाचे आई-वडील पुढच्या घरात बसले होते. मुलाचे  वडील कैलास संतोष माळी हे भाजीपाला चा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या घटनेने कुटुंबावर संकट ओढावले आहे. 

Web Title: 13-year-old son dies