बोदवड येथे 13 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 18:05 IST2017-09-21T17:56:53+5:302017-09-21T18:05:25+5:30

बोदवड,दि.21 : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील अण्णाभाऊ साठे नगरातील प्रकाश शिराळे यांची मुलगी मनीषा प्रकाश शिराळे (वय 13) या बालिकेने गुरुवारी सकाळी 10 वाजता घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.

13-year-old girl commits suicide in Bodhwa | बोदवड येथे 13 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

बोदवड येथे 13 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक मुद्देकपडे धुतल्यानंतर आंघोळ करते असे सांगून मनीषा गेली वरच्या मजल्यावर वडील प्रकाश शिराळे करतात वाजंत्रीचे काममनीषा ही चौथ्या नंबरची मुलगी

ऑनलाईन लोकमत
बोदवड,दि.21 : शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील अण्णाभाऊ साठे नगरातील प्रकाश शिराळे यांची मुलगी मनीषा प्रकाश शिराळे (वय 13) या बालिकेने गुरुवारी सकाळी 10 वाजता घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला.  
मनीषा हिने सकाळी कपडे धुतल्यानंतर आंघोळ करते असे सांगून ती वरच्या मजल्यावर गेली. बराच वेळ झाल्यावरही ती न परतल्याने कुटुंबियांनी जाऊन पाहिले असता घरातील पंख्याला ओढणीने लटकलेल्या अवस्थेत ती आढळून आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
प्रकाश शिराळे वाजंत्रीचे काम करतात.त्यांना पाच मुली आहेत मनीषा ही चौथ्या नंबरची मुलगी होती. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी वडील शहरातील दुर्गादेवी मंडळाच्या मिरवणुकीत वाद्य वाजवण्यासाठी गेले होते.

Web Title: 13-year-old girl commits suicide in Bodhwa